मुंबई.दि.06 ऑक्टोबर 2021 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-विक्रम कांबळे) :– 23 ऑक्टोबर 2021 ला विद्यार्थी भारती संघटना राष्ट्रीय बालिका हक्क परिषद आयोजित करत आहे. सोबतच 14 नोव्हेंबर बालदिनानिमित्त बालविवाह, बलिकाशिक्षण अश्या अनेक बालीकांच्या प्रश्नांना घेऊन ‘चलो मंत्रालय’ चा नारा देत राणी बाग ते आझाद मैदान अशी रॅली काढणार आहे.
नुकताच राजस्थान मध्ये तिथल्या सरकारने बालविवाहास कायद्याने मान्यता दिली आहे. यापूर्वी ह्याच राजस्थान सरकारने कायदा केला होता की, लग्नासाठी मुलगा आणि मुलीचे वय समान असावं, त्याच राजस्थान मध्ये आता बालविवाहाच्या नोंदणीस परवानगी दिली जातेय, उद्या जाऊन तिथे बालविवाह सुरू झाले तरी सरकारचा आक्षेप राहणार नाही. हेच चित्र हळूहळू संपूर्ण भारतात पसरलेल दिसायच्या आधीच ते थांबवायला हवं.
तसेच तालिबानिंच्या निमित्ताने अफगाणिस्तान मध्ये झालेली स्त्रियांची अवस्था आपण पाहतच आहोत.तालिबानी आपला चेहरा दाखवू लागले आहेत , शाळा म्हणजे वेश्यालय म्हणणाऱ्या अश्रफ घैरात यास काबूल विद्यापीठाचे कुलगुरू त्यांनी केले आहे
देशाचे संपूर्ण इस्लामीकरण ?? होत नाही तो पर्यंत मुलींनी शाळा कॉलेज मध्ये येऊ नये असे तालिबान सरकारला खुश करणारे फतवे काढणारा , अनेक पीएचडी होल्डरला बाजूला सारून फक्त बीए असलेल्या अश्रफ घैरातयाला का काबूल विद्यापीठाचे कुलगुरू केले हे सांगायला कोणी मोठा विश्लेषक नकोय अफगाणी महिला, अफगाणची अर्धी जमात घरा घरात कैद होणार आहे, त्याची सुरवात झाली आहे.
दिवसेंदिवस महिलांना बंदिस्त ठेवण्याचे डाव सुरूच आहे. इथे तिच्या जन्मापासूनच तिच्या अस्तित्वावर प्रश्न तयार होत आहेत. मुलगी आहे म्हणून जन्माला येण्याआधी गर्भपात करून मारलं जातंय, तर मुलगी झाली म्हणूनही तिला मारून टाकलं जात आहे.
आताही 100 पैकी जवळपास 10 बालिकांचा बालविवाह होत आहे. आणि ह्या लॉकडाऊन च्या काळात तर हा आकडा लाख मध्ये गेला आहे तरी कोणाला ह्याची खबर नाही. दिवसागणिक बलात्काराच्या घटना इतक्या वाढत आहेत की, एक दिवस मुलींनी घराच्या बाहेर पडू नका असेही नियम लादण्यात येतील. आजही 7 च्या आत घरात अस त्यांना शिकवलं जातंय. मुलींनी फक्त चूल आणि मूल बघावं हा मनुवादी विचार पुन्हा एकदा नव्याने डोकं वर करून लादला जाईल. हळूहळू ही तालिबानी विचारसरणी वाढत आहे. एक दिवस ती मानसिकता महिलांना घरातच डांबून ठेवेल. स्त्रीला उपभोगण्या पलिकडेही तिला बुद्धी असते हे पाहणं विसरत चाललो आहोत. हे चित्र बदलून नवीन समाज निर्माण होण्याऐवजी हे चित्र दिवसेंदिवस बिघडत चाललं आहे.
मुलींना शिक्षणापासून वंचित ठेऊन स्त्री म्हणजे गुलाम हे सूत्र पेरलं जात आहे. त्यामुळे 23 ऑक्टोबर 2021 रोजी विद्यार्थी भारती संघटना राष्ट्रीय बालिका हक्क परिषद आयोजित करत आहे. यात वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या मान्यवरांना घेऊन बालिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे. शिक्षण, जात, धर्म, लिंग , प्रांत, आरोग्य अश्या वेगवेगळ्या घटकांना घेऊन बालिकांचे अनेक वेगवेगळे प्रश्न असतात, ह्या प्रश्नांचा चारही बाजूने विचार व्हावा. व त्यावर आपल्याला मार्ग काढता यावा ह्यासाठी आखलेली ही संपूर्ण चर्चा असणार आहे.
सोबतच राजस्थान मध्ये झालेला बालविवाहाच्या कायद्याचा निषेध करत विद्यार्थी भारती संघटना बालदिनानिमित्त बालिकांचा प्रश्नावर प्रकाश पडावा म्हणून ‘बॅटरी मोर्चा ‘ देखील काढणार आहे.
बालकांच्या सर्वच प्रश्नांवर काम करणारी चिरंजीवी संघटना जी ‘बचपन बचाओ , मानवता बचाओ’ ह्या विचारला घेऊन काम करते ती देखील ह्या मोहिमेत सामील होत आहे. अशी माहिती विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली आहे.