Home ताज्या बातम्या आठ महिन्याचे भाडे मागितल्याने घरमालकास चौथ्या मजल्यावरुन दिले ढकलुन

आठ महिन्याचे भाडे मागितल्याने घरमालकास चौथ्या मजल्यावरुन दिले ढकलुन

0

सांगवी,दि.03 सप्टेबंर 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- सांगवी पोलिस स्टेशन हाद्दीत घडला धक्कादायक प्रकार खुन करण्याचा प्रयन्त,शिवकृपा निवास सुदर्शन नगर पिपंळे गुरव येथील सचिन शिवदास पोरे यांच्या बिल्डींग मध्ये पाटोळे कुटुंब भाड्याने राहत असून त्याचे आठ महिन्याचे भाडे थकल्याने भाडेकरुला ते भाडे मागण्यासाठी 29 ऑगस्ट ला संध्या 8.30 वा. घरमालक पोरे व त्यांचा मुलगा सौरभ गेला होता.त्याचा राग भाडेकरु पाटोळे कुंटुबाला आला.

आरोपी विजय पाटोळे त्यांची पन्ती व मुलगी आणि मुलगा साहिल विजय पाटोळे यांना भाडे मागण्यास आल्याचा राग आल्याने फिर्यादी घरमालक पोरे व त्यांचा मुलांना टेरेसवर बोलवुन घेतले.धक्काबुक्की,शिवीगाळ करत मुलाचा जीव घेण्याच्या उद्देशाने आरोपी पाटोळे नी घरमालकाच्या मुलाला ढकलत ढकलत भिंती जवळ नेऊन चौथ्या मजल्यावरुन ढकलुन दिले,सुदैवाने मुलगा बचावला,गंभीर दुखापत व जखमी झाल्याने
सांगवी पोलिस स्टेशन मध्ये आरोपी पाटोळे व पाटोळे कुटुबांच्या विरुद्धात दि.02 सप्टेबंरे रोजी राञी 9.58 वाजता. गुन्हा रजि.356/2021 भा.द.वि कलम 307,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पोलिस उपनिरिक्षक संतोष येडे असुन पुढील तपास सांगवी पोलिस करत आहेत.

Previous articleमहिला अधिका-यावर फेरीवाल्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध; पिंपरी चिंचवड च्या अधिकार्‍यानी सावधानी बाळगावी- अ‍ॅड.नितीन लांडगे
Next articleसाने कुटुंबामागे राष्ट्रवादीची ताकद उभी करणार – अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty + seventeen =