Home ताज्या बातम्या ‘प्राण ते प्रज्ञा’ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल- ज्येष्ठ नेते खासदार शरद...

‘प्राण ते प्रज्ञा’ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल- ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार

0

मुंबई, दि. 31ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- योगविद्या हे भारताने जगाला दिलेले तत्त्वज्ञान आहे. जगन्मान्य अशी योगसाधना सातत्याने केल्यास मानवी आयुष्याच्या अखेरपर्यंत श्वसनक्रिया सुरळीत व उत्तमपणे राहण्यास मदत होईल. योगाचे विविध प्रकार व तंत्र आत्मसात करण्यासाठी ‘प्राण ते प्रज्ञा’ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राष्र्टवादी पक्षाचे सर्वासर्व खासदार शरद पवार साहेब यांनी व्यक्त केला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज डॉ. प्रज्ञा पाटील लिखित ‘प्राण ते प्रज्ञा’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार शरद पवार यांच्यासह सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, आमदार हिरामण खोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.शरद पवार बोलताना म्हणाले, योगविद्येच्या प्रसारासाठी उपयुक्त अशा या पुस्तकाचे इंग्रजी व हिंदीमध्ये भाषांतर केल्यास जास्तीत जास्त वाचकांना याचा दैनंदिन आयुष्यात उपयोग करता येईल, असा सल्ला या पुस्तकास शुभेच्छा देताना दिला.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, सर्वसामान्याला परवडेल असा योग हा व्यायाम प्रकार असून याच्या नियमित साधनेने अनेक शारीरिक व्याधी दूर होण्यास मदत होते. प्राणायाम व योगासनामुळे श्वसन संस्थेतील सर्व इंद्रियांचा वापर पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होते. त्यामुळे सर्वानी आपल्या दैनंदिन आयुष्यात योगासने करावी. सुदृढ राष्ट्र निर्मितीसाठी या पुस्तकाचा नक्कीच हातभार लागेल, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सतत 103 तास योग करण्याचा विक्रम केलेल्या डॉ. प्रज्ञा पाटील लिखित ‘प्राण ते प्रज्ञा’ या पुस्तकात प्राणायाम करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, प्राणायाम साधना कशी करावी, प्रकृती नुसार प्राणायाम, विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साधण्यासाठीची माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे.

Previous articleपि.चि.मनपात रिपाई(आठवले) पक्षाचे नगरसेवक अगामी निवडणुकीत युवक आघाडीचे असतील,तयारी सुरु झाली-युवक अध्यक्ष प्रणव ओव्हाळ
Next articleमहिला अधिका-यावर फेरीवाल्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध; पिंपरी चिंचवड च्या अधिकार्‍यानी सावधानी बाळगावी- अ‍ॅड.नितीन लांडगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 5 =