पिंपरी,दि.17 ऑगस्ट 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गटाचे) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिला सल्ला पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेब यांच्या मदतीने पुनावळे येथील कचरा डेपोची जागा त्वरित ताब्यात घ्या
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नियोजित कचरा डेपोची पुनावळे येथील जागे जवळ डेपोच्या आजुबाजूची हजारो एकर जागा मोठमोठया बलाढ्य बांधकाम व्यवसायिक व राजकीय पुढार्या घेतली आहे . पुनावळे येथे 74 एकर जागेवर कचरा डेपोचे आरक्षण असून ही जागा ताब्यात देण्यासाठी व कचरा डेपो सुरु करण्यासाठी गेली 20 वर्षापासुन विरोध होत आहे . मा.आयुक्त राजेश पाटील साहेब आपण डॅशिंग मनपा आयुक्त आहात त्याचा अम्हाला अभिमान आहे. त्यामुळे आपल्या शहरातील दुसरे डॅशिंग पिंपरी -चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश साहेब यांची मदत घेवून आपण पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घ्या व लवकरात लवकर आधुनिक पध्दतीचा कचरा डेपो सुरु करुन शहरातील नागरीकांना दिलासा द्या
पिंपरी -चिंचवड महानगर पालिकेत 1997 ला पुनावळे गांव समाविष्ट करण्यात आले, त्यानंतर पुनावळे येथील 74 एकर जागेवर कचरा डेपोचे आरक्षण टाकण्यात आले ती जागा वनखात्याची असुन त्या जागेचा मोबदला म्हणून 4 कोटी रूपये महापालिकेने शासनाला जमा केले आहेत.तसेच पर्यायी जागा म्हणून पिंपरी सांडस येथील जागा वनखात्याला दिली आहे.
मात्र गेली 20 वर्षापासुन पुनावळे कचरा डेपोच्या आजुबाजुला हजारो एकर जमीन कवडीमोल भावाने घेणारे बांधकाम व्यवसायिक व काही नामाकींत दुर्त राजकारणी हा कचरा डेपो होऊ नये म्हणून गेली 20 वर्षापासुन प्रयत्न करीत आहेत, प्रशासन सुद्धा त्यांच्या विरोधाला बळी पडत आहे.
मा.आयुक्त साहेब आपण पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश साहेब यांची मदत घेवून या कचरा डेपोची जागा ताब्यात घ्यावी व लवकरात लवकर पुनावळे येथील कचरा डेपो सुरू करावा व मोशी येथील कचरा डेपोवरचा ताण कमी करावा. जनतेला दिलासा द्यावा जागा मोठी असल्याने तिथे विविध प्रयोग करुन शहराच्या कचर्याची विलेवाट लावावी. आयुक्त राजेश पाटील यांना शहरध्यक्ष धुराजी शिंदे यांनी निवेदन पञकाव्दारे सल्ला दिला.