पिपरी, दि.10 ऑगस्ट 2021 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत(धर) यांच्या नगरसेवक पदाबाबत पुढील आठ आठवड्यात निर्णय घ्यावा, असे निर्देश मंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती ए.ए. सय्यद आणि एस. जी. दिघे यांच्या खंडपीठाने दिले आहेत. या कार्यवाही मुळे शिलवंत(धर) यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून रद्द होऊ शकते.या आठ आठवड्या मध्ये विभागीय आयुक्त पुणे यांना तत्काळ निर्णय घेऊन हे प्रकरण निकाली काढायचे असल्याने शिलवंत(धर)यांच्या अडचणीत माञ भर पडणार असल्याचे चिञ दिसत आहे.
महापालिकेत ठेकेदारी करणे हे त्यांच्या अंगलट येणार हे माञ स्पष्ट झाल्यांने संपुर्ण शहरात व राजकीय वर्तृळात चर्चेची बाब झाली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर सुलक्षणा शिलवंत या नगरसेविका झाल्या. सध्या त्या स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही कार्यरत असुन. करोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेने शहरातील गोर-गरीब नागरिकांना मोफत मास्क पुरविण्यासाठी दहा लाख मास्कची खरेदी केली होती. करोनाच्या संधीचा फायदा घेत स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी सुलक्षणा शिलवंत यांनी आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर करून आपल्या पतीच्या व भावांच्या नावे असलेल्या कंपनीच्या नावे महापालिकेला 1 लाख मास्क पुरविले होते. तसेच त्यापोटी दहा लाखांची रक्कमही
महापालिकेकडून प्राप्त केली होती.लोकप्रतिनिधी (नगरसेवक) म्हणून कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वत:च्या फायदयासाठी महापालिकेच्या कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होत येत नाही.हि बाब शिवसेनेचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक जितेद्रं ननावरे यांनी प्रशासनाच्या लक्षात आणुन दिली.व या घटनेचा संपुर्ण पाठपुरावा केला.पालिका आयुक्त व विभागीय आयुक्त यांच्या मार्फत निर्णय देण्यास विलंब आढळुन आल्याने 1. जितेद्रं बाळासाहेब ननावरे व 2.रमेश नानासाहेब वाघीरे यांनी 1.विभागीय आयुक्त पुणे,2.आयुक्त महानगरपालिका पिंपरी-चिंचवड,3.सुलक्षणा शिलवंत(धर) नगरसेविका राष्र्टवादी काॅंग्रेस पिं.चि.मनपा यांच्या विरुद्धात ॲड.निरंजन भावके मार्फत मंबई उच्च न्यायालयात रिट याचीका(रिट पिटीशन) दाखल केली, त्यावर 06 ऑगस्ट 2021 रोजी सुनावणी झाली. अशी माहिती दि.09 ऑगस्ट 2021 रोजी माजी नगरसेवक ननावरे यांनी पिंपरी येथे पञकार परिषद घेत माहिती दिली.
नगरसेवकाने निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्यास महापालिका अधिनियमातील तरतूदीनुसार (1OF and 11) सदर व्यक्ती हा नगरसेवकपदावर राहण्यास अपात्र ठरतो. कायद्यातील या तरतुदीनुसार सुलक्षणा शिलवंत या अपात्र ठरत असल्यामुळे त्यांचे पद रद्द करावे, यासाठी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी ॲड. निरंजन भावके यांच्यामार्फत मंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.या याचिकेवर सुनावणी झाली.सुनावणी दरम्यान ॲड.भावके यांनी सुलक्षणा शिलवंत यांच्या पती व भावाच्या नावे असलेल्या कंपनीने महापालिकेला एक लाख मास्क पुरविल्याचे तसेच त्यापोटी महापालिकेकडून दहा लाख रुपये घेतल्याचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. यावर न्यायमुर्ती ए.ए. सय्यद यांनी विभागीय आयुक्तांना तक्ताळ निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.यावर विभागीय आयुक्तांच्या वकीलांनी काही अवधी देण्याची न्यायालयाला विनंती केली. त्यावर न्यायालयाने पुढील आठ आठवड्यात शिलवंत
यांच्या पदाबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.महाविकास आघाडीची सत्ता महाराष्र्टात असताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्र्टवादीच्या नगरसेविका ह्या भाजपच्या नगरसेवकांच्या हाताला धरुन भाजपच्या नगरसेवकांच्या भ्रष्टाचारात सामील होत आहेत.त्यामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्ते संभ्रमात आहेत.राष्र्टवादीच्या वरीष्ट पदाधिकार्यांनी शिलवंत(धर)यांच्या वर कारवाही करायला हवी अन्यथा याचा फटका महाविकास आघाडीला बसेल,महाविकास आघाडी बदनाम होईल,भाजपा पुन्हा राष्र्टवादी पक्षाच्या विरोधात बोलायला मोकळे होणार,महाविकास आघाडीला यांचा फटका बसणारच त्यामुळे कारवाही व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वरीष्टांना देखील करणार असल्याचे जितेंद्र ननावरे म्हणाले.शिवसेना हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष जरी असला तरी असल्या भ्रष्टाचाराचे समर्थन कदापि करणार नाही असेही ननावरे यांनी म्हटले,नगरसेविका सुलक्षणा शिलवंत(धर)यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या प्रकरणावर विभागीय आयुक्त तत्काळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.