Home ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ९ऑगस्ट ऐवजी १२...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ९ऑगस्ट ऐवजी १२ ऑगस्ट २०२१ रोजी

0

पुणे, दि.६ ऑगस्ट २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) ही ९ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहिर करण्यात आले होते.

परंतु राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा ९ ऑगस्ट २०२१ ऐवजी १२ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येईल. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र १२ ऑगस्ट २०२१ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
वरील झालेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये दिली आहे.

Previous articleमहिला युवतींकरिता उद्योजकता परिचय वेबीनार
Next articleसुलक्षणा शिलवंत(धर) यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या प्रकरणावर मंबई उच्च न्यायालयाचे विभागीय आयुक्तांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 − six =