पिंपरी,दि.29 जुलै 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- जवाहरलाल नेहरु आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात झोपडपट्टी पुनर्वसन करण्यात आले असून ,ज्या मिळकत धारकानी नियमित हप्ते भरून घराची शासनाने घालून दिलेली नियम अटी व रक्कम आदा केलेली आहे .अशा मिळकत धारकांना पिंपरी चिंचवड महापालिका द्वारे एक एन.ओ.सी. देण्यात यावी,ज्या ठिकाणी महापालिकेच्या ठेवी आहेत अशा बँकेस त्याठिकाणी राहत असलेल्य घरमालकास घर मॉरगेस करून बँक नियमानुसार ज्यांना लोन हवे असेल अशाना त्यावर लोन दिले जावे. गोर गरीब जनतेला जर त्या घरावर लोन मिळाले तर मात्र त्यांची होणारी पिळवणूक सावकारी पध्दतीने असेल,मिनी फायनान्स कडून असेल ते थांबेल आणि ते घरावर लोन काढून आपली मोठी समस्या अडचन सोडवू शकतात.नियमित हप्ते भरून ते कर्ज देखील फेडू शकतात पण आज ही त्यांच्या हक्काचे घर मिळाले मात्र त्या घरावर ज्यापध्दीने लोन होते त्यातुन ते उद्योग उभारू शकतात व अडचणीत असणारे उद्योग सुरु करु शकतात. मुलांचे शिक्षण किंवा मुलींचे लग्न करण्यासाठी तो कर्ज काढू शकतो परंतु त्याउलट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात मात्र असे होत नाही ज्या घरांचे हप्ते भरले आहेत आणि अशा व्यक्तीस जर कर्ज घरावर पाहिजे असेल तर ज्या ठिकाणी आपल्या ठेवी आहेत अशा बँकेना आपण पत्र देऊन अशा लोकांना लोन देण्यासाठी नाहरकत प्रमाण पत्र द्यावे.अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष विनोद गायकवाड यांनी पञाव्दारे केली असुन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना भेटुन पञ दिले व या संबधीत विषायावर चर्चा केली.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा संघटक निरज कडु,उद्योजक विशाल कांबळे उपस्थित होते.