पिंपरी,दि.१६ जुलै २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पिंपरी-चिंचवड प्रभारी पदी माननीय सुर्यकांत वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री (भारत सरकार) रामदासजी आठवले साहेब यांनी स्वतः वाघमारे यांना पत्र देऊन नियुक्ती केली आहे वाघमारे यांचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील योगदान लोकांच्या हितासाठी केलेले कार्य आणि पक्षाचा व्यापक ते साठी केलेल्या कार्याच्या अनुषंगाने नेमणूक करण्यात आली आहे.सुर्यकांत वाघमारे यांनी लोणावळा नगरपरिषदेचे नगारध्यक्ष पद भुषविले असुन जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार संभाळत असुन पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पद निवडणूक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये घ्यावी यासाठी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासाचे कार्य करून रिपब्लिकन पक्ष व्यापक करण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी केली आहे व वाघमारे यांना पुढील राजकीय वाटचालीस साठी शुभेच्छाही दिल्या आहेत.निवडी नंतर वाघमारे यांनी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना हार अर्पण करुन अभिवादन केले.१५ जुलै २०२१ रोजी शहरातील पञकारांशी संवाद साधला
येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात शहर अध्यक्ष पदाची निवडणुक होणार असुन शहरात रिपब्लिकन पक्षात चुरस पाहिला मिळणार आहे.तसेच शहरात शहरध्यक्षा पदावरुन अनेकांन मध्ये नाराजी होती,अंतर्गत गटबाजीचे राजकारण वाढत चालल्याने शहरातील रिपब्लिकन पक्षाची शहराबदलची भुमीका काय हा प्रश्न निर्माण झाल्याने अनेकांनी पक्षाकडे पाठ फिरवणे पसंद केले.आता ऑगस्ट मध्ये शहरध्यक्ष पदाची निवडीमुळे शहरात नाविण्यपुर्ण वातावरण रिपब्लिकन पक्षात पहावयास मिळेल,त्यामुळे सर्व पक्षाचे व सर्वांचे लक्ष शहरध्यक्ष पदा कडे असुन शहरात चर्चेला उधान आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधुन त्यांच्याशी शहरासंबधी चर्चा करुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाची दिशा ठरवली जाईल,योग्य वेळी शहरातील चाचपणी करुन पक्षाचे उमेदवार दिले जातील,रविवारी पक्षाचा मेळावा अल्पाईन हाॅटेल पिंपरी आंबेडकर पुतळा परिसर मागे घेण्यात येणार होती माञ ती काही तांञिक कारणामुळे मंगळवार दि.२० जुलै २०२१ रोजी होणार असल्याचे सांगितले.पक्षाचे धेय धोरण वैयक्तीक कोणी ठरवल्यास व मनमानी कारभार केल्यास पक्षांतर्गत कार्यवाही करु अशी तंब्बी देखील सुर्यकांत वाघमारे यांनी दिली.या वेळेस २०२२ मध्ये महापालिकेच्या सार्वञीक निवडणुकीत पक्षाचे नगरसेवक महापालिकेत बसतील.असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला असुन मेळाव्यात नियोजीत आरखडा सांगणार आहेत या वेळी पञकार परिषदेला चंद्रकांताताई सोनकांबळे,बाळासाहेब भागवत,दिलीप कडलक,सिद्धार्थ चव्हाण,विजय जाधव,सुधाकर वारभुवन,सुरेश निकाळजे,रमेश चिमुरकर,सम्राट जकाते,के.एम.बुक्तर,कमलताई,कांबळे,लिंबराज कांबळे,भारत बनसोडे,सिकंदर सुर्यवंशी,भाऊसाहेब रोकडे,विनोद चांदमारे,दयानंद वाघमारे,स्वप्नील कांबळे,दत्ता ठाणांबीर,प्रणव ओव्हाळ,रमेश शिनगारे,धर्मेंद्र थोरात,बापुसाहेब वाघमारे,अश्विन खुडे,विलास गरड,स्वप्नील भोसले,सुरज कांबळे आदि पदाधिकारी कार्ये कर्ते उपस्थित होते