Home ताज्या बातम्या विकासनगर येथील महिलेने बदनामी व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत 62...

विकासनगर येथील महिलेने बदनामी व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत 62 वर्षीय व्यक्तीला घातला 18 लाखांचा गंडा

0

पिंपरी,दि.15 जुलै 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस क्राईम वाढत आहे,क्राईम चा आलेख चढता असल्याने पिंपरी चिंचवड शहर दहशतीखाली असल्याचे वातावरण एकंदरीत तयार होत आहे.खंडणी सारख्या गुन्हाचे प्रमाण वाढत आहे.मोबाई संदेश व ई मेल च्या साहय्याने संत तुकाराम नगर वैशाली स्विटस मागे पिंपरी येथील 62 वर्षीय व्यक्ती आयनुद्दीन वीजर पटेल यांस 2017 पासुन ते 14 जुलै 2021 पर्यंत ई-मेल व मोबाईल संदेशद्वारे,विकासनगर किवळे सहारा बेकरी जवळ राहणारी महिला आरोपी आरती मनोज पांचाळ उर्फ मंगल प्रकाश वाल्मीकी (वय 34) हिने भावनीक साद घालुन वेळोवेळी घर खर्चा साठी पैशांची मागणी करुन आईचे पेन्शनचे पेसे मिळाल्यावर व अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाल्यावर पैसे परत करीन असे म्हणत फिर्यादी आयनुद्दीन पटेल यांच्याशी जवळीक साधुन केली जास्त रक्कमेची मागणी.त्यावर फिर्यादी पटेल यांनी अरोपी महिलेस देण्यास नकार दिल्याने.फिर्यादी पटेल यांना ब्लॅकमेल करुन बदनामी करुन खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत ई-मेल व मोबाईल संदेश द्वारे वेळोवेळी आरोपी महिलेने स्वताच्या बॅंक खात्यावर तब्बल (18,00,000) अठरा लाख रुपये खंडणी स्वरुपात पैसे वसुल केले व अजुन पैशाची मागणी केल्याने मजबुर व वैतागलेल्या आयनुद्दीन पटेल यांने पिंपरी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन आरोपी महिला आरती मनोज पांचाळ उर्फ मंगल प्रकाश वाल्मीकी हिच्या वर पिंपरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं 459/2021 भा.द.वि क 384,507 नुसार (खंडणी) गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपासी अधिकारी पोलिस निरिक्षक बडेसाब नाईकवाडे हे असुन पुढील अधिक तपास पिंपरी पोलिस करत आहेत.

Previous articleआमदार लक्ष्मण जगताप व महेशदादा लांडगे यांच्या समोर पिंपरी चिंचवड शहरात महाविकास आघाडी फिकी आणि कमजोर…
Next articleरिपब्लिकन पक्षाची पिंपरी चिंचवड शहरातील दिशा मंगळवारी मेळव्यात ठरणार-सुर्यकांत वाघमारे(प्रभारी/निरिक्षक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − six =