Home ताज्या बातम्या प्रभाग क्र 16 विकासनगर किवळे भागात लोखंडी बोर्ड सहित फ्लेकसबाजी मुळे प्रभागाचे...

प्रभाग क्र 16 विकासनगर किवळे भागात लोखंडी बोर्ड सहित फ्लेकसबाजी मुळे प्रभागाचे विद्रोपीकरण तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दुर्लक्ष

0

विकासनगर-किवळे,दि.08 जुलै 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडुन प्रभाग क्रमांक 16 विकासनगर किवळे कडे हमेशा दुर्लक्ष असते.विकासनगर किवळे भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत,त्यामुळे अनेक समस्या ह्या उदभवतात,त्यातच स्वताची मार्केटींग करण्यासाठी राजकीय पुढार्‍यासोबत छोटे मोटे व्यावसायीक यांनी जाहिरात बाजीचा जोर धरला आहे,लाईटचे पोल असतील रस्त्याचे नामफलक असतील अशा ठिकाणी छोटे मोटे फ्लेक्सबाजीच प्रमाण वाढले आहे त्यामुळे प्रभागाचे विद्रोपीकरण होत आहे.ब प्रभाग क्षेञीय आधिकारी,आकाश चिन्ह परवाना ,अतिक्रमण विभागाचा विकासनगर-किवळे भागात कानाडोळा आहे.त्यामुळे 16 नं प्रभागातील विद्रोपीकरणाला महानगरपालिकेचे कर्मचारी आणि आधिकारी पण जबाबदार ठरत आहेत.

व्यवसायीकांकडून लावलेल्या अनधिकृत फलकांवर विकासनगर किवळे भागा करवाई होणे गरजेचे आहे.नगरसेवकांकडून होणाऱ्या जाहिरात बाजी वर महापालिका करवाई कधी करणार ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात रस्ते,कॉलनी किंवा चौकाला लोखंडी पाट्या लावून स्वतःच नाव देण्याचा प्रकार घडत आहे.तसेच बऱ्याच ठिकाणी फेलक्स लावून प्रभागाचे विद्रुपीकरण होत आहे. प्रभागातील प्रत्येक मुख्य चौकात राजकीय जाहिरातबाजी वाढत आहे. सन असो किंवा राजकीय लोकांचे वाढदिवस त्यानिमित्त पोस्टरबाजी पहायला मिळते. आता हा प्रकार कोविड काळातही घडत आहे.शाळा,सोसायट्या समोर पण घडतो आहे. नामांकित शाळा,व्यावसायिक यांचे लोखंडी बोर्ड बनवुन रस्त्यालगत चौकाचौकात अनधिकृत फलक लावलेले असतात. विरोध केल्यास राजकीय नेत्यांकडून  दमदाटी करण्यात येते. अधिकृत जागी अनधिकृत फलक लावले जातात. प्रशासन  मात्र याकडे  दुर्लक्ष करते. त्यामुळे प्रभागाचे सौंदर्य नष्ट होत आहे.

आजकाल लोक प्रतिनिधि कडून काम कमी आणि जाहिरात जास्त पहायला मिळते. नवीन काम करायची असेल तर फेल्क्स लावण्यात येतात. शुभेच्छा फलकाच्या स्वरूपात पण वास्तवात काम मात्र काहीच नसते. महत्व कामाला आहे की जाहिरातबाजिला हाच मोठा प्रश्न आहे. महापालिकेने निपक्ष राहून अनधिकृत जाहिरात करणाऱ्यावर करवाई करावी.

प्रभागातील फ्लेक्स मुळे अनेक वेळा दिशादर्शनासाठी जे फलक असतात ते देखील दिसत नाही. तसेच फ्लेक्सवर  लिहिले जाणारे मजकूर काही वेळा दादागिरी ची भाषा करणारे असतात .आजकाल कोठेही जागा मिळेल तिथे फ्लेक्स लावलेले असतात अनधिकृत फ्लेक्स वर कडक कारवाई व्हायला पाहिजे.परवानगी न घेता जेवढे फ्लेकस लागतील त्यावर कारवाई करुन दंड वसुल केला पाहिजे. पॅन्डामिक काळात लोकसेवे पेक्षा जाहिरात बाजी जास्त जोरात होत आहे.निवडणुका जवळ आल्याने अचानक जागे झालेले आजी माजी नगरसेवक आणि भावि यांची धडपड जनसेवा आणि फाईल प्रोजेक्ट साठी जाहिरात बाजी सुरु आहे.महानगर पालिका या कडे लक्ष देणार का? निपक्षपाती कारवाई करणार का या कडे विकासनगर किवळे प्रभागातील सर्व नागरिकांचे लक्ष लागुन आहे.

Previous articleनृत्यकला मंदिर आणि लायन्स क्लब व इतर संस्थांचा सामाजिक उपक्रम ओंजळीतून सांडण्याअगोदर गरजूंना मदत करा-जयमाला इनामदार
Next article..ना बाबर सेना ! ना बारणे सेना ! शिवसेना च !!- खा. संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × five =