देहुरोड,दि.25 मे 2021(प्रजेचा विकास-संपादकीय):-अल्पावधीतच लोकप्रियता प्रजेचा विकासला मिळाली असुन राजकीय,शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक सर्व क्षेञातील सर्वात शेवटच्या व्यक्ती पर्यंत विचार करत प्रजेचा विकास ने साप्ताहिक च्या माध्यमातुन २५ मे २०१७ रोजी सुरवात केली आजतागायत सर्व समावेशक भुमिका घेत प्रजेचा विकास नी पाऊले उचली आहेत न्युज पोर्टल च्या आणि सोशल मिडियाच्या माध्यमातुन आपणांस आणखी सूखकारक सोय उपलब्ध करत २५ मे २०२१ ला साप्ताहिक प्रजेचा विकासला चार वर्ष पूर्ण होत असून आता हे साप्ताहिक आज पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे.ही कठीण आणि तपपूर्ती ची वाटचाल केवळ आणि केवळ आपल्या सर्व हितचिंतकांच्या, देणगीदारांच्या व जाहिरातदारांच्या आणि मित्रांच्या सहकार्याने पूर्ण होऊ शकले आहे म्हणून आधी आपल्या सर्वांचे जाहीरपणे आभार मानतो आपण सर्वांनी पाठबळ दिले आणि विश्वास वाढवला म्हणूनच साप्ताहिक प्रजेच्या विकासला चार वर्षाची वाटचाल करणे शक्य झाले वास्तविक वृत्तपत्र क्षेत्रात प्रचंड चिंताजनक वातावरण बनले आहे घटलेल्या जाहिरातींचा ओघ शासनाकडून जाहिरातींचे मिळणार्या तुटपुंज्या सहकार्य आणि व्यापारी व व्यावसायिकांनी तसेच जनतेने सुद्धा वृत्तपत्राकडे फिरवलेली पाठ याचा परिणाम प्रत्येक दैनिकाला आणि प्रत्येक साप्ताहिकाला भोगावा लागत आहे. विभागीय बड्या वृत्तपत्रांचे काय आणि जिल्ह्यातील शहरातील ग्रामीण भागातील वृत्तपत्रांचे काय सर्व प्रिंट मिडियाचे दुखणे आणि चिंता एक सारखेच बनले आहेत आवक घटली म्हटल्यावर वृत्तपत्रांना स्वतःचा खर्च काढणे अशक्य बनले आहे.दैनिक चालवणे किंवा साप्ताहिक चालवणे हत्ती पोहोसल्या सारखे झाले आहे. स्वतःचा खर्च निघत नाही म्हटल्यावर नफा राहणे किंवा फायद्यात राहणे वेगळीच गोष्ट बनलेले आहे.असे असूनही अनेक जण या क्षेत्रात का थांबून आहेत हा प्रश्न अनेकांना पडतो परंतु यात गहन विचार करण्यासारखे काहीच नाही उत्तर सोपे आहे मनातील आवड, जिद्द,काहीतरी करून दाखवण्याची उमेद एखाद्या क्षेत्राला समर्पित होऊन सेवा देण्याची प्रचंड ताकद तिची इच्छा झपाटलेला पणा जुनून जनसेवेचा प्रबळ विचार फार विचित्र असतो तो माणसाला कधीही दुःखाची वेदना किंवा साहित्य साधनांची कमतरतेची जाणीव होऊ देत नाही,वाटेवर कितीही काटे असले तरी चालत राहण्याचे सुचवत राहतो बळ देत राहतो.
प्रजेचा विकासच्या वाटचालीचे हे एक गमक आहे.ब्लॅकमेल करुन पैसा कमवण्यासाठी किंवा दहशत माजवण्यासाठी प्रजेच्या विकास ची स्थापना झालेली नाही महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहराच्या प्रश्नांना हात घालता यावा विकासात्मक गोष्टींना प्रसिद्ध देता यावी सकारात्मक दृष्टिकोन नागरिकांना प्रेरित करीत राहावा या दृष्टिकोनातून साप्ताहिक प्रजेचा विकास मधून सकारात्मक वृत्त प्रसारणाचे काम सातत्याने केले जात आहे,त्यासाठी प्रजेचा विकास पुणे जिल्हातील पिंपरी चिंचवड शहर व देहुरोड या बाॅर्डर वर असलेल्या विकासनगर-किवळे येथुन प्रकाशित होतो,जनतेच्या सर्व प्रश्नाना समजुन घेत शहराच्या व जिल्हाच्या राज्याच्या जडणघडणीत छोटसे योगदान देत आहे, कोणाला त्रास देणे बदनाम करणे किंवा धाकदपटशा दाखवून पैसा कमावणे या प्रकारची पत्रकारिता प्रजेच्या विकासाच्या माध्यमातून झालेली नाही याला कारण आपण सर्व वाचक आणि आमचे हितचिंतक मित्र कारणीभूत आहेत. आपणा सर्वांचा आदरयुक्त वचक आमच्या कामावर राहिलेला आहे आणि तो तसाच पुढेही राहील याची आजच्या वर्धापन दिनानिमित्त ग्वाही देतो,संपादक या नात्याने आपणास एक गोष्ट स्मरण करुन देतो की साप्ताहिक प्रजेचा विकास निष्पक्षपणे,निपक्षपाती,धर्मनिरपेक्ष,निर्भीडपणे समाजहितकारक,क्राईम संदर्भात,शैक्षणीक व सर्व घडामोडी संदर्भात बातम्या देणे चालूच ठेवेल.आपल्या सर्वाना सोशल मिडियाच्या या युगात अपडेट व बातम्या पाहण्यासाठी आपली प्रजेचा विकासची वेब साइट पाहु शकता,युट्युब,फेसबुक पेजवर ही आपण व्हिडीओ,आणि लिंक पाहु शकता,त्यासाठी आपण आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मधुन प्रजेचा विकास अॉप डाऊन लोड करा,युट्युब चॅनलला सब्सक्राईब करा फेसबुक पेज ला लाईक आणि फाॅलो करा.प्रजेचा विकास वेबसाईट वर रोजच्या बातम्या पहाता येत असल्या मुळे अल्पवधीतच प्रजेचा विकास साप्ताहिक व ऑनलाइन न्युज चॅनल म्हणुन प्रसिद्ध व लोकप्रिय झाले आहे.कोविड-१९ मुळे आपण वर्धापन दिन साजरा करु शकलो नाही याची खंत मना मध्ये सतत राहील,कोरानाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व परस्थिती बदल्यावर पुढच्या वर्षी आपण वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करुया,आपण ह्या अडचणीच्या परस्थितीत प्रजेचा विकास सोबत राहाल अशी अपेक्षा करतो.आमच्या सकारात्मक पत्रकारितेला आपले पाठबळ लाभत राहील अशी अपेक्षा करून पुन्हा एकदा सर्वांचे या वर्धापन दिनी आभार मानतो