पिंपरी,दि.17 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२१ पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे महापौर प्रथम नागरिक उषा उर्फ माई ढोरे यांना विनंतीपूर्वक निवेदन देण्यात आले,कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या अटी व नियमांचे सर्व नागरिक पालन करत आहेत पण आता अनेक सार्वजनिक ठिकाण मंदिर, रेल्वे, बस सेवा व अनेक गर्दी जमा होणाऱ्या सार्वजनिक जागा कोरोना महामारी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या अटी व नियमांचे पालन करून हे सार्वजनिक ठिकाण सुरू आहेत त्यामुळे डाॅ.आंबेडकर जयंती म्होत्सव 2021 समीती कडुन विनंती करण्यात आली नागरिकांना विज्ञानवादी विवेकी संविधान वादी बनवण्याचे कार्य हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यामधून होत आलेले आहे या वर्षी जयंती च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर मनोरंजन व प्रबोधनाच्या माध्यमातुन जनजागृती होईल.व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या माध्यमातून सकारात्मक आशावादी उपयोग होईल असे मत जंयती महोत्सव कमिटीने महापौर यांच्याशी बोलताना व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड वासियांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याची अनुमति द्यावी तसेच या संबंधित निर्णय महाराष्ट्रातल्या करोडो देशातल्या शिव फुले शाहू आंबेडकरवादी संविधान प्रेमी करोडो लोकांच्या भावनांचा मान सन्मान व अस्तित्व आणि अस्मितेचा विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे आपण तत्काळ यासंदर्भात शासन व प्रशासनाची भूमिका स्पष्ट करावी अन्यथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्ष उल्हासात साजरी करण्यासाठी, शासनाकडे या भूमिकेसाठी लवकरच आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला.या वेळी सुरेश निकाळजे,देवेंद्र तायडे,सर्वजीत बनसोड,संजीवन कांबळे,कुणाल व्हावळकर,मारुती भापकर,विनोद गायकवाड,दिनकर ओव्हाळ,विजय ओहोळ,धम्मराज साळवे,संतोष शिंदे,हरि नायर,रोहन सुर्यवंशी,मनोज जगताप आदी.पदाधिकारी व पञकार प्रकाश बुक्तर,पञकार विकास कडलक,पञकार विनोद चांदमारे,जनमत चॅनल चे प्रमोद गरड,संयोगीता साबळे हे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त यांची ही समिती ने भेट घेतली व जंयती विषयावर सकारात्मक चर्चा पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या शी झाली.
जंयती महोत्सव समीतीच्या मागण्या
११ एप्रिल रोजी क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त पिं.चिं शहरातील महात्मा ज्योतिबा फुले स्मारक पुर्ण वेळ पुष्पहार अर्पण करण्यासाठी खुले करण्यात यावे.
१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिं.चिं.शहरातील पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी पुर्ण वेळ खुले ठेवावे.
शहरात भिम जयंती साजरी करणाऱ्या बौद्ध विहार,मंडळींना ,पक्षांना शासन नियम लावून परवाणगी देण्यात यावी.