सलग तिस-यांदा पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड
पिंपरी,दि.09 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या अध्यक्ष पदी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुलसिंह परदेशी यांची निवड करण्यात आली असल्याची माहीती सचिव विश्वासराव आरोटे यांनी दिली.
अतुलसिंह परदेशी हे मागील पंधरा वर्षांपासून पत्रकारीतेत आपले अमूल्य असे काम करीत असून गेल्या पाच वर्षांपासून आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवत पत्रकार बांधवांच्या समस्यासाठी ते नेहमी आग्रेसर राहीले आहे त्यामुळे वृत्त वाहिनी संघाचे अध्यक्ष रणधीर कांबळे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे राज्य संघटक संजयजी भोकरे यांनी त्यांची निवड पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या अध्यक्ष पदी निवड केली असल्याची माहीती राज्य सचिव विश्वासराव आरोटे यांनी दिली.
पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या सलग तिस-यादा अतुलसिंह परदेशी यांची निवड झाल्याने कामगार फलोत्पादक मंत्री दिलीपराव वळसे पाटील मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारने शिरूर चे खासदार डाॅ.अमोल कोल्हे आमदार महेश दादा लांडगे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप अन्ना बनसोडे दिलीपराव मोहिते पाटील अतुल बेनके मावळचे आमदार सुनिल शेळके,प्रजेचा विकासचे संपादक-विकास कडलक यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने तिस-यांदा पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाची जबाबदारी दिले आहे ती चोख पार पाडून पत्रकार बांधवांचे प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या तसेच पत्रकार संघाचा विस्तार करणार असल्याचे अतुलसिंह परदेशी यांनी सांगितले.