निगडी,दि.09 डिसेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भक्ती-शक्ती चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे गेले दोन वर्षापासून हे काम जोरात चालू असल्यामुळे पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल. गेले दोन वर्षे हे काम चालू असल्यामुळे वाहतुकीसाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील मुंबई पुणे हायवे चे रस्त्याचे पुलाचे काम पूर्ण झालेले आहे याची पाहणी मनसे चे नगरसेवक सचिन चिखलेनी केली जर आपण मुंबई पुणे हायवे चालु केला तर वाहतुकीस सोयीस्कर होईल व खाली होत असलेले उड्डाणपुलाचे काम सोयीस्करित्या करता येइल,वाहतूक रस्त्यावर होत आहे त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. भक्ती शक्ती उड्डाणपुलावरील मुंबई पुणे हायवे चालु करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने हा रस्ता चालु करेल असा इशारा पालिका प्रशासनाला व सत्ताधार्याना निवेदना द्वारे सचिन चिखले यांनी दिले.यावर पालिका प्रशासन सुन्न होते. उद्या सत्ताधारी भाजप उद्धघाटन करणार तर राष्र्टवादीने साधला आजच डाव (दि.09डिसेंबर)त्यामुळे श्रेयवादासाठी का होईना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाण पूलाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.
यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेविका सुमनताई पवळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विशाल काळभोर, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.राष्र्टवादीने उद्धघाटन केलेल्या पुलाचे आता पुन्हा सत्ताधारी भाजपा व पालिका प्रशासना कडून 10 डिसेबंर 2020 रोजी सकाळी 10.30 वा भाजपाच्या नगरसेविका महापोर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी आमदिर लक्ष्मण जगताप,आमदार महेश लांडगे,खासदार श्रीरंग बारणे,खासदार सुप्रिया सूळे,खासदार अमोल कोल्हे,उपमहापोर केशव घोळवे,सभापती संतोष अण्णा लोंढे,पक्षनेते नामदेव ढाके,विरोधी पक्ष नेते राजु मिसाळ,आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या उपस्थितीत होणार उद्धाटन(लोकार्पण).दोनदा होणार पुलाचे उदघाटन राष्र्टवादीने उद्धघाटन केलेल्या पुलाचे पुन्हा भाजपा सत्ताधारी करणार पुलाचे उद्धघाटन अशी चर्चेने संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरात जोर धरला आहे.
Home ताज्या बातम्या भक्तीशक्ती चौकातील उड्डाण पूलाचे उद्धघाटन राष्ट्रवादी काँग्रेस कडुन .तर पुन्हा 10 डिसेंबरला...