Home ताज्या बातम्या आळंदी-नगराध्यक्षांच्या पतीची नगरपरिषदेच्या कामात ढवळाढवळ ; त्यावर थेट जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश

आळंदी-नगराध्यक्षांच्या पतीची नगरपरिषदेच्या कामात ढवळाढवळ ; त्यावर थेट जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश

0

आळंदी,दि.04 डिसेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरेकर कांबळे यांच्या पतीचा परिषदेच्या कामकाजात होणारा हस्तक्षेप व ढवळाढवळ तातडीने थांबवा असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे त्याबाबत कारवाईचा अहवाल पाठविण्याचे आदेश मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना दिलेत, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर-कांबळे यांचे पती अशोक कांबळे नगरपरिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप व ढवळाढवळ करीत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांच्याकडे प्राप्त झालेल्या. त्यानुसार खेडचे तत्कालीन विभागीय अधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती चौकशीत नगराध्यक्षा उमरगेकर-कांबळे यांचे पती कामकाजामध्ये सहभाग घेत ढवळाढवळ करत असल्याचे आढळले त्यानंतर समितीने तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना अहवाल सादर केला त्यांच्या बदलीनंतर डॉ. देशमुख यांच्याकडे ही तक्रारीचा पाढा चालू राहिला त्यामुळे त्यांनी कारवाईच्या आदेशाचे पत्र दिले आहे नगर परिषदेच्या कामकाजात नगरसेविका यांचे पती किंवा नातेवाईक यांचे सभेचे कामकाज चर्चा यामध्ये हस्तक्षेप,कर्मचारी/अधिकारी यांच्याशी वाद घालणे,उर्मेट बोलणे,कार्यलयीन कामात ढवळाढवळ करणे,नगरपरिषदेत येणार्‍या नागरीकांशी असभ्य बोलणे,नगरपरिषदेतील परिसरातील गैरवर्तणुक होत असलेल्या तक्रारी वरुन निदर्शनास स्पष्ट झाले.त्यावरु ननगर परिषदेचे अध्यक्ष मुख्यधिकारी यांना याबाबत दखल घेऊन उचित कारवाई करण्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे त्याला नुसरून नगराध्यक्षा यांच्या पतीचा नगर परिषद कामकाजातील हस्तक्षेप थांबवण्याबाबत तातडीने कारवाई करावी आणि अहवाल जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे सादर करावा असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यधिकारी अंकुश जाधव हे नगरध्यक्षा यांचे पती अशोक कांबळे यांच्यावर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण आळंदी करांचा लक्ष लागले असून संपूर्ण नगरपरिषदेच्या हद्दीत हा चर्चेचा विषय बनला आहे.

Previous articleवस्त्यांना जातीची नव्हे तर महापुरुषांची नावे द्यावीत; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
Next articleपदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून उमेदवार विजयी ; महाविकास आघाडीचा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करुन पिंपरीत जल्लोष साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − ten =