चिंचवड,दि.24 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पुण्यातील सर्व कामगार संघटनांचा सहभाग राहील.देशात कामगार कायद्यांमध्ये मोदी सरकारने अत्यंत मूलभूत असे कामगार विरोधी बदल केलेले असून, कामगारांची सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात आलेली आहे. करोना काळातील शांततेचा फायदा घेऊन अत्यंत बेलगामपणे संरक्षण –विमा-बँकांसारख्या मूलभूत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमदेखील विकून टाकण्याच्या देशविरोधी हालचाली सुरू आहेत. सर्वत्र कंत्राटीकरण सुरू आहे. करोना काळात कोट्यावधींचा रोजगार गेलेला आहे. त्यांना तात्काळ साहाय्य देण्याची गरज आहे. त्याच वेळी शेतकऱ्यांना बड्या जागतिक व्यापारी कंपन्यांच्या दावणीला बांधणारे कायदेदेखील केलेले आहेत. या सर्वांच्या विरोधात देशातील सर्व कामगार आणि शेतकरी दिनांक गुरूवार दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी एक दिवसाचा सार्वत्रिक संप करणार आहेत.26नोव्हेंबर 1949 हा घटना समितीमध्ये भारतीय संविधान मंजूर होण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. केंद्रातील मोदी सरकार हे देशाची केवळ कामगार शेतकऱ्यांच्याच हिताला पायदळी तुडवित आहे असे नव्हे, तर त्यासाठी घटना मोडीत काढून राज्यांच्या अधिकारावर नांगर फिरवून त्यांची भीषण आर्थिक-राजकीय कोंडी करत आहे. त्याविरोधातील आवाज बुलंद करण्यासाठी संपासाठी 26 नोव्हेंबर हाच दिवस निश्चित करण्यात आला आहे. म्हणूनच या संपाची घोषणा ‘घटना बचाओ ! देश बचाओ!!’ अशी आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमधील इंटक, आयटक, सिटू, भारतीय कामगार सेना, श्रमिक एकता महासंघ, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, युटीयुसी, इत्यादी सर्व केंद्रीय कामगार संघटनांशी संलग्न तसेच स्वतंत्र कामगार संघटना ; तसेच बँका, विमा, वीज मंडळ, संरक्षण इत्यादी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी; अंगणवाडी-आशा, आरोग्य परिचारक, तसेच सर्व योजना कर्मचारी, मार्केट यार्ड संबंधित सर्व कर्मचारी-हमाल आणि घर कामगार उस्फूर्तपणे, पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. ग्रामीण भागात शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून कृती करणार आहेत.संपामधील प्रमुख मागण्या आणि सरकारची धोरणे याबाबत कामगार- शेतकऱ्यांना व जनतेला तपशीलवार माहिती देण्यासाठी कृती समितीच्या वतीने एक विशेष पुस्तिका ‘शेतकरी –कामगार विरोधात मोदी सरकार’ ही पुस्तिकादेखील प्रकाशित करून तिच्या १० हजार प्रतींची विक्री आतापर्यंत करण्यात आलेली आहे. कामगार-कर्मचाऱ्यांपर्यंत संपाची भूमिका पोचविण्यात आलेली आहे.सध्याच्या करोना आपत्तीमुळे संपाच्या दिवशी कामगार-कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी बोलावून मोर्चे काढले जाणार नाहीत. त्या ऐवेजी खाली दिलेल्या ठिकाणी कामगार-कर्मचारी तोंडाला मास्क बांधून, रस्त्याच्या दोन्ही बाजूस ओळीने, रहदारीस कोणताही अडथळा न करता, हातात मागण्यांचे फलक धरून काही एकमेकांपासून योग्य त्या अंतरावर उभे राहतील व मानवी साखळी करतील.
मानवी साखळीची ठिकाणे आणि वेळ,स्थळ खालील प्रमाणे असेल
1. पिंपरी चौक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा) सकाळी 9.30 वा
2.रांजणगाव (पुणे नगर मार्ग)एशियन चौक सकाळी 9.30 वा
3.जिल्हाधिकारी कचेरी (डॉ. आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कचेरी )सकाळी 11.00वा
4.चौफुला (पुणे सोलापूर मार्ग ) सकाळी 9.30वा
5.बारामती (एम्. आय. डी. सी. मुख्य चौक )सकाळी 9.30वा
6.अलका टॉकिज चौक (सेनापती बापट पुतळा) पासून लक्ष्मी रोड –सिटी पोस्ट चौकापर्यंत सकाळी 10.00वा
7.घर कामगार व असंघटित कामगारांच्या वतीने
हडपसर- ओव्हरब्रीजखाली,
कोथरूड कर्वे पुतळा,
सिंहगड रोड पु.ल. देशपांडे उद्यान
येरवडा-मच्छी मार्केट
कात्रज कोंढवा मार्ग
हॉटेल महाबळेश्वर पेट्रोल पंपजवळ
सर्वत्र दुपारी 2.30 वा.
यामध्ये कामगार संघटनांच्या बरोबरच विद्यार्थी-युवक-महिला तसेच अन्य सामाजिक संस्था संघटनादेखील या संपाला पाठिंबा देण्यासाठी मानवी साखळीमध्ये सहभागी होतील.असे पञकार परिषदेत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.या वेळी संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम, निमंञक-अजित अभ्यंकर,एल.एस.मारु,रघुनाथ कुचिक,दिलीप पवार,किशोर ढोकले,अनिल रोहम,शुभम किसन दिघे,मनोहर गडेकर उपस्थित होते.
26 नोव्हेंबर 2020 च्या संपामधील शेतकरी-कामगारांच्या मागण्या :-
1.करोना काळात रोजगार गमावलेल्या व आयकर मर्यादेच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या सर्व कुटुंबांना प्रतिमहा रूपये 7500 रूपये अनुदान केंद्र सरकारतर्फे द्या.
2.सर्व गरजू व्यक्तिंना प्रतिमहा 10 किलो धान्य मोफत उपलब्ध करून द्या.
3.ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजूंना प्रतिवर्षी 200 दिवस, 600 रूपये मजूरीच्या दराने उपलब्ध करून द्या.
4.केंद्र सरकारने नुकतेच केलेले कामगार कायद्यांमधील कामगार विरोधी बदल तात्काळ मागे घ्या. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर हमी भाव देण्याची जबाबदारी न सोडता, शेतकऱ्यांना जागतिक कंपन्यांच्या दावणीला बांधणारे कायदे मागे घ्या.
5.खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात एखाद्या रोगाप्रमाणे पसरलेली कंत्राटी कामगारांची प्रथा तात्काळ बंद करा. कंत्राटी कामगारांना आस्थापनांच्या कायम सेवेत घ्या.
6.बँका-विमा-संरक्षण-पोस्ट-रेल्वे-पेट्रोलियम-हवाई वाहतूक-बंदरे-दूरसंचार-शिक्षण-आरोग्य-वीज-राज्य परिवहन- इत्यादी क्षेत्रातील संस्थांचे कोणत्याही मार्गाने होणारे खाजगीकरण तात्काळ बंद करा. सार्वजनिक क्षेत्र सक्षम आणि अधिक जनताभिमुख करण्यासाठी परिणामकारक पावले उचला.
7.घर कामगार, बिडी कामगार,रिक्षावाले, पथारीवाले, अंगमेहनीत मजूर, बांधकाम कामगार, गरीब शेतकरी, शेतमजूर, असंगटित कामगरांसाठी पेन्शन, मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना व यंत्रणा निर्माण करून त्यासाठी पुरेशी अंदाजपत्रकीय तरतूद करा.
8.आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, इत्यादी सर्व योजना कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून सामावून घ्या.
9.सरकारी कर्मचाऱ्यांना मुदतपूर्ण पेन्शन घ्यावयास लावणारे केंद्र सरकारी परिपत्रक मागे घ्या . सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना २००४ पूर्वीची पेन्शन योजना पूर्ववत लागू करा.
10.महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, ग्राम पंचायत, इत्यादी संस्थांना पुरेसा कर्मचारी वर्ग नेमण्यासाठी तसेच त्यांच्या सेवा सुधारण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्या.
रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस अंदोलन दडपण्याचा प्रयन्त करतात असा अरोप कामगार संघटना संयुक्त कृती समीती कडुन करण्यात आला
रांजणगांव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे जाहिर आवाहन :
काही कामगार संघटना कामगारांना संप,आंदोलन करण्यास उद्युक्त करतात. आपण
अशा बेकायदेशीर संपामध्ये सहभागी होवू नये. आपल्या काही रास्त मागण्या असतील तर कायद्यामध्ये दिलेल्या तरतुदींचा अवलंब करावा. परंतु अशा प्रकारे बेकायदेशीररित्या संप, आंदोलन करण्यास आपणांस जबरदस्ती केली जात असल्यास त्वरित रांजणगांव पोलिस स्टेशन येथे संपर्क करावा व अशा दबावाला,जबरदस्तीला बळी पडू नये. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे दडपण, जबरदस्ती,दबाव आल्यास तकारीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा :रांजणगांव एमआयडीसी पोलिस स्टेशन संपर्क कमांक 02138-232139 श्री. सुरेशकुमार राऊत,पोलिस निरिक्षक,
मोबाईल नंबर 9823108452 असे पञक काढुन कंपनी च्या ठिकाणी लावल्याचे अजित अभ्यंकर यांनी सांगितले