देहुरोड,दि.20 नोव्हेबंर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांची विशेष शाखा 1 याठिकाणी बदली झाली असून त्यांनी देहूरोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा आज पदभार सोडत उद्या विशेष शाखेचा पदभार स्वीकारतील मनीष कल्याणकर यांच्या जागेवर देहूरोड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून विलास तुळशीराम सोंडे यांची नियुक्ती झाली आहे
देहुरोड ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून मनीष कल्याणकर यांची नियुक्ती झाल्यापासून ते आजतागायत सर्व देहुरोड करांच्या राजकीय-सामाजिक ते सर्व नागरिकांच्या मनामध्ये जागा निर्माण करणारे व नागरिकांची वेळोवेळी संपर्क साधून देहूरोड ची सुव्यवस्था शांत ठेवणारे मनीष कल्याणकर यांची विशेष शाखा 1 या ठिकाणी बदली झाली त्यामुळे देहूरोड शहरातच नव्हे तर पुणे जिल्ह्यातून मनीष कल्याणकर सर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे इन्द्रपाल सिंग रत्तु (उपाध्यक्ष पुणे जिल्हा), सिद्धार्थ चव्हाण(मावळ लोकसभा वरिष्ठ उपाध्यक्ष), दिलीप कडलक(मावळ लोकसभा कार्यध्यक्ष),सुनील गायकवाड(देहुरोड शहरध्यक्ष) राहुल गायकवाड(देहुरोड सचिव), लक्ष्मण भालेराव(मावळ तालुका अध्यक्ष)यांनी भेटुन शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.