Home ताज्या बातम्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण

0

मुंबई,दि.27 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असुन त्यांना मुंबईतल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कालच आठवले एका कार्यक्रमात होते. त्यांच्या समवेत अनेक जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अभिनेत्री पायल घोष हिने काल रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर आठवले यांना खोकला व अंगदुखीची लक्षणे जाणवायला लागली. राज्यात वरिष्ठ नेत्यांना कोरोनाची लागण होत असून देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यानंतर आता खासदार सुनील तटकरे व त्यांच्या नंतर खासदार आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ”दादा, लवकरात लवकर बरे होऊन आपण पुन्हा दुप्पट जोमाने लोकांच्या सेवेत दिवस-रात्र रुजू व्हाल. आरोग्याची काळजी घ्यावी. आम्ही सर्वच आपण बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत,” असे तटकरे यांनी काल अजित पवार यांना उद्देशून म्हटले होते. आज त्यांना स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही दौरे करत होते. नुकताच त्यांनी उस्मानाबादचा पूरस्थिती पाहणी दौरा केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली. आजपर्यंत बाहेर फिरत होतो. आता विश्रांती घ्यावी, अशी परमेश्वराची इच्छा दिसते असे सांगत फडणवीस सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.

Previous articleमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये पद भरती
Next articleमराठा आरक्षणासंदर्भात घटनापीठाचे गठन करण्याची मागणी पुन्हा व ताबडतोब करणार – मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 4 =