पिंपरी,दि.17 ऑक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आज पासून प्रारंभ होत असलेल्या घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त गगुणवंत कामगार संघटना चे व अॅन्टी कोरोना टास्क फोर्स च्या राष्र्टीय अध्यक्षा तसेच मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा भारती चव्हाण यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या संदेशात प्रत्येकाने कुंटुंब आणि स्वतःची जबाबदारी संभाळली पाहिजे.प्रत्येक महिला ही स्री शक्ती आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील माझ्या महिला भगिनींवर त्यांच्या मुलांची, कुटुंबियांची व वृद्ध व्यक्तींची जबाबदारी वाढली आहे. मार्च पासून चालू झालेल्या कोरोना विषाणूचा लढा आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे लढण्यात आपण यशस्वी होत असलो तरी कोरोना अद्याप संपलेला नाही. मात्र त्याचा प्रभाव कमी झालेला दिसून येत आहे.घटस्थापना, दसरा,दिवाळीसारखे सण येत आहेत. घटस्थापनेची आज पासून प्रतिष्ठापना होत असताना माझी शहरातील व राज्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की कृपया घटाची स्थापना आपल्या घरीच करावी. मंडळात काम करावे लागल्यास एक किंवा दोन महिलांनी देवीची सेवा करावी. सण साजरा करतेवेळी कोठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्वांनी मास्कचा वापर करावा तसेच हात साबणाने नियमित स्वच्छ धुवावे,सॅनिटार्झर चा वापर करा.ह्युमिनीटी संभाळा आपण स्वताः आजारी पडणार नाही याची काळजी घ्या.सर्वांनी कोरोना विषाणूशी लढताना कोरोना बाबत दक्षता घेऊन सहकार्य करावे असे आवाहन डाॅ. भारती चव्हाण यांनी केले.
Home ताज्या बातम्या मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा भारती चव्हाण यांनी दिल्या घटस्थापनेच्या शुभेच्छा..