Home अकोला हाथरस प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या रिपाइं (आठवले) गटाची मागणी

हाथरस प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या रिपाइं (आठवले) गटाची मागणी

0

अकोला,दि.07 अॉक्टोंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-आनंद बोदडे):-उत्तर प्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील वाल्मिकी समाजातील मनीषा वाल्मिकी या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली तसेच पाठीचा कणा सुद्दा मोडण्यात आला असून काही समाज कटांकणी एवढ्या नीच आणि निंदनीय प्रकारे मनीषा वाल्मिकी वर अत्याचार करून तिची हत्या केली.

पीडित कुटुंबाला न्याय मिळावा ,आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी तसेच स्थानिक पोलीस अधिकारी, उपचार करणारे डॉक्टर,जिल्हाधिकारी यांच्या वर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा करिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अकोला महानगर जिल्हाध्यक्ष मा.गजाननभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन देण्यात आले व उत्तर प्रदेश येथील हाथरस च्या घटनेचा तीव्र निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हाध्यक्ष रोहित रविंद्र वानखडे, रिपाइं (आ) महानगर प्रसिद्धी प्रमुख युवराज भागवत,महानगर उपाध्यक्ष राजकुमार सिरसाट , पूर्व अध्यक्ष अनिल पहुरकर, रिबविप प्रसिद्धी प्रमुख वैभव वानखडे ,मनोज भालेराव,विजय सावंत,स्वप्नील पालकर,मनोज सुरवशे,विद्यानंद क्षीरसागर,आकाश सोनोने ,भूषण जामणिक, तुषार ठोके,आकाश हिवराळे,संतोष नृपणारायन,शंकर कांबळे,आषीश पालकर,शुभम सिरसाट,दीपक नवघरे,विशाल राजपाल,हिरा घुमरे,सागर इंगळे,संकेत कांबळे,हर्षदीप कांबळे,कुमार पालकर,संतोष अवसरमोल,राजेश निधाने,सागर सारवण, सुनील सारवण, रोशनी गजानन कांबळे, मंगला सिरसाट,निर्मला इंगळे,सुरेखा तायडे,चंद्रकला बाई तायडे,कुसुम दंदी, पदमा दंदी,सुमन क्षीरसागर,शोभा शेगावकर,सुनीता कांबळे,शिलाबाई इंगळे,लिलाबाई वाहुरवाघ,शोभा गवई,देवकाबाई अंभोरे,अलविना इंगळे,शालू शेगावकर,कुसुम खंडारे,राजकन्या शिरसाठ,दीपा दांडगे,बेबी दांडगे,माधुरी हिवराळे,बेबी कांबळे,सुर्यकांता कांबळे,लताबाई सरकटे,पद्माबाई उपरवट,वंदना गवई,गोकर्णा हिवराळे,नलुबाई गोपणारायन,छाया तेलगोटे,सुनीता गायकवाड,मिनाबाई गायकवाड,शेवंताबाई हिवराळे,कांताबाई भागवत,फुलवंताबाई वानखडे,उशाबाई वानखडे,सरलाबाई गेठे,नंदाबाई पाटील,शोभा गोपणारायन,दुर्गा गवई,मीराबाई घिरे,आम्रपाली लांडगे,माया तायडे,साधना पालकर,अश्विनी इंगळे,चंद्रकला बाई शिरसाठ आदी महिला कार्यकर्ते सोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते…

Previous articleकोरोना नव्हे तर उपासमारीनेच मरण्याची वेळ!तेल्हारा तालुका मंडप बिछायत असोसिएशनचे धरणे आंदोलन
Next articleतेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलेला शिवसैनिकांच्या सतर्कतेने मिळाले जिवदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × two =