चिंचवड,दि.3आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-प्रकाश बुक्तर):-उत्तरप्रदेश महिलांवर होणा-या अत्याचाराचा जाहिर निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आठवले) सरचिटणीस महिला आघाडी महाराष्र्ट व मा.नगरसेविका चंद्रकांताताई सोनकांबळे यांच्या नेतृत्वात चिंचवड चौकात अंदोलन घेण्यात आले, उत्तरप्रदेश हाथरस मधील मनिषा वाल्मिकी या मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ तसेच उत्तरप्रदेश मधील विविध ठिकाणी बलात्कार, सामूहिक बलात्काराच्या अनेक घटना घडल्याआहेत. यामध्ये उत्तरप्रदेश सरकार कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे.
लोकांना कायदयाची भिती राहिली नाही. महिलांवर अन्याय,आत्याचाराचे प्रमाण हे वाढताना दिसत आहे. अत्याचार थांबविण्यास उत्तरप्रदेश सरकार अपयशी ठरले आहे.महिलांना संरक्षण देण्यासाठी आणखी कडक कायदे करण्यात यावेत. गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे. गुन्हेगारांना फाशी झाली पाहीजे या मागणीसाठी दिनांक 02 ऑक्टोबर 2020 रोजी स.11 वा. कांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळयासमोर चिंचवड येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले.सदर मागण्यांचे निवेदन पिंपरी पोलीस स्टेशनला देण्यात आले.आंदोलनामध्ये चंद्रकांताताई सोनकांबळे, सम्राट जकाते, सुधाकर वारभुवन,के.एम.बुक्तर, रमेश चिमूरकर, अजीज शेख, लिंबराज कांबळे, भारत बनसोडे, प्रणव ओव्हाळ, अजय झुंबरे, दत्ता ठाणांबीर, एम.पी.कांबळे, धर्मेंद्र थोरात, केतन कांबळे,नरेश शिनगारे, अशोक कांबळे, स्वप्नील कांबळे, राजू वारभूवन, दादा शिरोळे, संजय गायकवाड, सुरेश गायकवाड, राहू धुरंधरे, महेंद्र अडसूळ, किरण शिंदे, महादेव शिंदे,प्रकाश बुक्तर, चंदू सोनवणे, शामल मगर, उर्मिला पालखे व अर्चना मगर उपस्थित होते.