Home ताज्या बातम्या भटक्या कुञ्यांचा बंदोबस्त न केल्यास भटकी कुञी पिंंपरी चिंचवड पालिका आयुक्तांच्या आॅफिस...

भटक्या कुञ्यांचा बंदोबस्त न केल्यास भटकी कुञी पिंंपरी चिंचवड पालिका आयुक्तांच्या आॅफिस मध्ये सोडणार – शहराध्यक्ष धुराजी शिंदे

0

पिंपरी,दि.30 सप्टेबंर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुञ्यांचा सुळसुळाट सुटला असल्याने गेली दोन वर्षापासुन रिपब्लिकन सेनेचे पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष करतायत भटक्या कुञ्यां विषया संदर्भात पालिकेत पाठपुरावा करत आहे.परंतु भटक्या कुञ्याची विलेवाट लावण्यात पालिका कर्मचारी अपयशी ठरले आहेत.जानेवारी2019 ते जुन 2019 पर्यंत मनपा आयुक्त, पशुवैद्यकीय अधिकारी यांना शिंदे यांनी पत्रव्यवहार केला आहे.विशेष म्हणजे काल (दि.29) कुत्रा चावल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे शिंदे आणखी संतापले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील श्वान प्रेमींच्या दबावामुळे गेली दोन वर्ष झाले भटकी कुत्री पकडणे बंद केले आहे. त्यामुळे शहरात कुत्रीच कुत्री झाली आहेत. याला जबाबदार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, आरोग्य निरीक्षक दीपक कोटियाना हे सर्वस्वी जबाबदार आहेत असा अरोप देखील शहरध्यक्ष शिंदे यांनी केला आहे. त्यामुळेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या पालिकेतील ऑफिस मध्येच थेट रिपब्लिकन सेनेच्या वतीने भटकी कुत्री सोडण्यात येणार आहेत असा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे.

भाजपची महापालिकेत सत्ता येवून साडेतीन वर्षे झाली आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून पशुवैद्यकीय विभागाने भटकी कुत्री पकडणे बंद केले आहे. सारथीवर भटक्या कुत्र्यांची तक्रार केल्यास चार दिवसांनी तक्रारीचे निवारण न करता तक्रार क्लोज केली जाते. शहरात नागरिकांचे फिरणे मुश्कील झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना याचा जास्त त्रास होत आहे. दुचाकीच्या मागे कुत्री लागल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळेला कामावरून घरी जाणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. याची जाणीव आयुक्त श्रावण हर्डीकर यांना व्हावी यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयुक्तांच्या पालिकेतील ऑफिस मध्ये भटकी कुत्री सोडण्यात येणार आहेत याची नोंद घ्यावी असे पञ देखील शिंदे यांनी आयुक्तानां दिले आहे.यावर शहरात चांगलीच चर्चा रंगली असुन पालिका प्रशासन या विषयाचा गांभिर्याने विचार करणार का की हा विषय वार्‍यावर सोडणार या कडे सर्वपक्षीय आणि शहरातील नागरिकांचे लक्ष लागुन आहे.

Previous articleदेहुरोड- दिपकभाऊ निकाळजे सा.वि.संघटना,रिपाई(A) – यांचा बोधिसत्व जन जागृत संघाला जाहिर पाठिंबा
Next articleआनंदनगर, चिंचवड स्टेशन झोपडपट्टीमधील लोकांचे आरोग्य धोक्यात – के.एम.बुक्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen + 13 =