पुणे,दि.17 आॅगस्ट 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी अनेक अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती. अखेर डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ. राजेश देशमुख हे सन २००८ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून देखील काम पाहिले आहे.आयएएस अधिकारी असलेले डॉक्टर राजेश देशमुख हे हाफकिन इन्स्टिट्यूट व्यवस्थापकीय संचालक म्हणून सध्या कार्यरत होते.त्यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची ते जागा घेतील. राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांची जाग रिक्त झाली होती.
Maharashtra Administration appoints IAS Rajesh Deshmukh as the new collector of Pune. He is currently serving as the Managing Director of Hafkine Bio-Pharmaceutical Corporation Limited, Mumbai pic.twitter.com/15xKLua6WS
— ANI (@ANI) August 17, 2020
नवल किशोर राम यांची पीएमओत नियुक्ती झाल्याने पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. दरम्यान, आज (सोमवार) राज्य सरकारने पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती केली आहे.
1)डाॅ. राजेश देशमुख यांची नियुक्ती पुणे जिल्हा अधिकारी पुणे या रिक्त पदावर
2) श्री एस ए तागडे यांची नियुक्ती प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष विभाग मंत्रालय मुंबई या पदावर
3) श्री पराग जैन यांची नियुक्ती सचिव वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबई या पदावर
4)श्री. सुनील चव्हाण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी औरंगाबाद या पदावर
5)डाॅ.कुणाल खेमनार यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक हाफकिन औषध निर्माण महामंडळ मुंबई या पदावर
6)श्री. संदीप कदम यांची नियुक्ती जिल्हाधिकारी भंडारा या पदावर करण्यात आली आहे