देहुरोड-विकासनगर,दि 12 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-सतत वादाच्या चर्चेत आसणार्या किवळे येथील विब्स इंग्लिश मिडियम शाळेत शासनाने वह्या पुस्तकांची शाळेत विक्री करण्यास मनाई असताना सुद्धा बेकायदेशीरपणे शाळेत विक्री केली जाते यामुळे बेकायदेशीर विक्री तात्काळ तात्पुरत्या स्वरुपात बंद करून पालकांकडून होणारी लूट थांबवली असुन मीना कॉलनी येथे दि.25 जुन ला महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी तसेच माजी नगरसेवक मनोज खानोलकर व नगरसेविका प्रज्ञा खानोलकर व श्रीजीत रमेशन यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाही करण्यात आली होती.
आज दिनांक11 जुलै 2020 रोजी सर्व गोष्टी शाळेच्या विरोधात असताना देखील शाळेला क्लिन चिट देत,शाळेवर कारवाही करण्या ऐवजी शाळेचे तात्पुरते सिल वर पक्के सिल न करता आज तात्पुरते सिल काढुन वर्ग खोल्या मोकळया करुन देत आहेत अशी माहीती मिळताच आरटी आय कार्य कर्ते रमेशान व माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी आक्रमक भुमिका घेत या मुजोर शाळे विरोधात व पालिकेच्या शिक्षण विभागाच्या गलतान कारभार विरोधात उपोषणांस बसले होते .
तूर्तास तरी उपोषण मागे घेण्यात आले आहे देहूरोड पोलीस स्टेशन कडून covid-19 संदर्भात काही इन्स्ट्रक्शन आणि माहिती पत्र देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता प्रशासनास सहकार्य म्हणुन उपोषण सायं 7.00वा मागे घेण्यात आले. तरी शाळेवर पुढील कारवाई होई पर्यंत पाठपुरावा केला जाईल.असे उपोषण करते माजी नगरसेवक मनोज खानोलकर,आरटीआय कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी सांगितले.या उपोषणाला आर पी आय देहूरोड,मनसे देहुरोड व विकासनगर रिक्षासंघटना तसेच विद्यार्थी संघटनेने पाठींबा देत कार्यवाहीची मागणी केली. पर्यवेक्षक प्रभारी शिंदे सिल खोलण्यास आले असता नगरसेविका प्रज्ञाताई खानोलकर यांनी आधी कार्यवाही करा आणि मग सिल उघडुन द्या अशी मागणी केल्याने अजुन काही दिवस तरी व्हिब्स शाळेच्या त्या चार वर्ग खोल्या बंद राहतील
शाळेवर कारवाही झाली पाहिजे चुकीच्या गोष्टी तेव्हाच थांबतील,अजुन एक नवीन माहिती समोर आली की शाळा ही गावटान दाट वस्ती भागात असुन तिचे बांधकाम पुर्ण पणे अनआधिकृत आहे.जर असाच सर्व गलतान कारभार असेल तर या शाळेमुळे पुढे चुकीच्या घटना वाढतील आणि शाळेतील लोकांची बोलण्याची भाषा अजुन मग्रुरी होईल त्यामुळे हि कारवाही होणे गरजेचे आहे,लोकांन मध्ये चर्चा चालु आहे की राजकीय दबावा खाली अधिकारी पण कारवाही करणार नाहीत,तर कोण आहे या मागे जो ह्या चुकीच्या कारभारा विरोधात शाळेला जरब बसण्या ऐवजी शाळेची मुजोरी वाढवण्यास मदत करत आहे,कोणी स्थानिक नगरसेवक असु वा कोणती राजकीय शक्ती त्यावर पण कारवाही करु असे श्रीजीत रमेशन यांनी पञा द्वारे सांगितले.