देहुरोड-विकासनगर,दि 11 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-सतत वादाच्या चर्चेत आसणार्या किवळे येथील विब्स इंग्लिश मिडियम शाळेत शासनाने वह्या पुस्तकांची शाळेत विक्री करण्यास मनाई असताना सुद्धा बेकायदेशीरपणे शाळेत विक्री केली जाते यामुळे बेकायदेशीर विक्री तात्काळ तात्पुरत्या स्वरुपात बंद करून पालकांकडून होणारी लूट थांबवली असुन मीना कॉलनी येथे दि.25 जुन ला महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी तसेच माजी नगरसेवक मनोज खानोलकर व नगरसेविका प्रज्ञा खानोलकर व श्रीजीत रमेशन यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाही करण्यात आली होती.
आज दिनांक11 जुलै 2020 रोजी सर्व गोष्टी शाळेच्या विरोधात असताना देखील शाळेला क्लिन चिट देत,शाळेवर कारवाही करण्या ऐवजी शाळेचे तात्पुरते सिल वर पक्के सिल न करता आज तात्पुरते सिल काढुन वर्ग खोल्या मोकळया करुन देत आहेत अशी माहीती मिळताच आरटी आय कार्य कर्ते रमेशान व माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी आक्रमक भुमिका घेत या मुजोर शाळे विरोधात व पालिकेच्या शिक्षण विभागाच्या गलतान कारभार विरोधात आज पासुन उपोषणांस बसत आहेत.
शाळेवर कारवाही झाली पाहिजे चुकीच्या गोष्टी तेव्हाच थांबतील,अजुन एक नवीन माहिती समोर आली की शाळा ही गावटान दाट वस्ती भागात असुन तिचे बांधकाम पुर्ण पणे अनआधिकृत आहे.जर असाच सर्व गलतान कारभार असेल तर या शाळेमुळे पुढे चुकीच्या घटना वाढतील आणि शाळेतील लोकांची बोलण्याची भाषा अजुन मग्रुरी होईल त्यामुळे हि कारवाही होणे गरजेचे आहे,लोकांन मध्ये चर्चा चालु आहे की राजकीय दबावा खाली अधिकारी पण कारवाही करणार नाहीत,तर कोण आहे या मागे जो ह्या चुकीच्या कारभारा विरोधात शाळेला जरब बसण्या ऐवजी शाळेची मुजोरी वाढवण्यास मदत करत आहे,कोणी स्थानिक नगरसेवक असु वा कोणती राजकीय शक्ती त्यावर पण कारवाही करु असे श्रीजीत रमेशन यांनी पञा द्वारे सांगितले.
किवळे येथील विद्या भुवन (विब्स) इंग्रजी माध्यमिक शाळेत अयोग्य पद्धतीने वह्या,पुस्तके विक्रीसाठी ठेवल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाने गुरुवारी (दि.25) शाळेच्या चार वर्ग खोल्यांना सील केल्या आहेत.
विकासनगर येथे विब्स इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये वह्या पुस्तकांची विक्री होत असल्याची तसेच त्यासंदर्भातील ऑडिओ क्लिप पाठविल्याची तक्रार पालकांनी आरटीआय कार्यकर्ते श्रीजित रमेशन आणि खानोलकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार नगरसेविका खानोलकर यांनी शिक्षण मंडळाकडे दोन दिवसांपूर्वी तक्रारही दाखल केली होती.तर दि.२६जुन रोजी रमेशन यांनी आयुक्त हार्डीकर व शिक्षण विभागात तसेच देहुरोड पोलिस स्टेशन येथे शाळेवर फौजदारी दाखल करण्यात यावी तसेच शाळेचा मुजोर कारभार थांबवावे या मागणीचे अर्ज दाखल केले आहेत, शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिक्षण मंडळाचे तक्रार निवारण अधिकारी तथा पर्यवेक्षक विलास पाटील आणि रवींद्र शिंदे यांनी गुरुवारी शाळेची पाहणी केली. मुख्याध्यापिका शालु डे,नगरसेविका खानोलकर,मा.नगरसेवक मनोज खानोलकर, तुकाराम भोंडवे, आरटी आय कार्यकर्ते रमेशन, दोन पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत वह्या-पुस्तक ठेवलेले चार वर्ग खोल्यांना सील करण्यात आले.
लखो रूपयाचे वहया पुस्तके व ईतर साहित्य असलेल्या 4 खोल्या महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सील केल्या आहेत,तर पालकांन मध्ये हा चर्चेचा विषय ठरला आसुन प्रशासन शाळेवर काय कारवाही करेल या कडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.