विक्री करण्याकरीता देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या इसमास अटक गुन्हे शाखा, युनिट 5 ची कारवाई अटक आरोपींकडुन 03 देशी बनावटीचे पिस्टल व 06 जिवंत काडतुसे असा एकुण 1,59,000/- चा मुद्देमाल जप्त
देहुरोड,५ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-
कोरोना प्रादुर्भाव मुळे लाॅकडाऊन असताना आणि दि.५ मे आज रोजी मा वरिष्ठांचे आदेशान्वये वटपोर्णिमेच्या सणाचे अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे व गुन्हे शाखा, युनिट 5 कडील पोलीस कर्मचारी हे खासगी चारचाकी वाहनाने आज पेट्रोलींग करीत असताना पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडेयांना त्यांच्या बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक व्यक्ती सोमाटणे फाटा येथे देशी बनावटीचे पिस्टल विक्री करीता घेवून येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी सोबतचे कर्मचारी यांना सुचना देवून त्यांच्या दोन टिम तयार करुन सापळा रचला.काही वेळाने मिळालेल्या माहितीप्रमाणे एक व्यक्ती रिक्षा मधुन उतरुन सोमाटणे फाटा येथे रोडच्या कडेला थांबुन कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे. त्याच्या हातामध्ये एक पांढर्या रंगाची कापडी पिशवी असल्याचे दिसुन आले,पोलीसांचा सुगावा लागताच त्याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून नाव व पत्त्ता विचारले असता त्याने त्याच नाव सचिन महादेव जाधव, वय 26 वर्षे धंदा मजुरी रा मु.पो. खडखडवाडी ता कोरेगाव जि सातारा असे सांगितले. त्यांची पंचां समक्ष झडती घेतली असता त्याच्या कमरेच्या डाव्या बाजुस पॅन्टमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे काळया रंगाची गावठी पिस्टल मॅक्झीनसह मिळुन आले तर त्याच्या पॅन्टीच्या डाव्या खिशामध्ये 06 जिवंत काडतूसे मिळुन आली.त्याच्या जवळील पांढर्या रंगाची पिशवी तपासली असता त्यामध्ये 02 पांढर्या रंगाची देशी बनावटीचे पिस्टल असे *एकुण 03 देशी बनावटीचे पिस्टल व 06 जिवंत काडतुसे किंमत रुपये 1,59,000/- चा मुद्देमाल मिळुन आला.* पिस्टल व जिवंत काडतुस जवळ बाळगण्याचा परवाना आहे का ? तोाकसा या बाबत विचारपुस केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली त्याला गुन्हे शाखा, युनिट 5 कार्यालय येथे आणुन सखोल तपास केल्यावर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचे आढळुन आले, पिस्टल व जिवंत काडतुस त्याच्या ओळखीचे मध्यप्रदेश येथील एका व्यक्तीकडुन विक्री करण्याकरीता आणल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.
सदर आरोपीवर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3(25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे, गुन्हे शाखा, युनिट 5 हे करीत आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त मा.रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुकत, मा. सुधिर हिरेमठ व मा. विनायक ढाकणे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे मा. राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा, युनिट-5 चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, मयुर वाडकर, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, शामसुंदर गुट्टे, संदिप ठाकरे, गणेश मालुसरे, सावन राठोड, फारुक मुल्ला, दयानंद खेडकर, स्वामीनाथ जाधव, भरत माने, नितीन बहिरट, राजकुमार इघारे, गोपाळ ब्रम्हांदे, राजेंद्र शेटे, राजेंद्र कदम व नागेश माळी यांनी केली.
Thanks good news
Thank you for your kind words and reading the news on the Prajecha Vikas news portal
thanku