देहूरोड,दि. 18 मे 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- श्रीक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदी पात्रात आज (दि.18 मे)सकाळी 11 वाजताच्या सुमारास पाण्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता त्या मृत व्यक्तीचे हात-पाय दोरीने बांधलेले तसेच बेल्टने त्याचा गळा आवळून खून करून मृतदेह पाण्यात फेकून देण्यात आलेल्या आवस्थेत सापडला होता.मृतदेह पाण्यात बुडावा या हेतूने मोठा दगड बांधून त्या मृत व्यक्तीस पाण्यात टाकण्यात आले होते. या घटनेची माहिती देहूरोड पोलीस ठाण्याच्या पथकास मिळाली असता त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ आढळूनआलेल्या वस्तु मुळे मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम देहूरोड पोलीसांनी सुरु केले होते मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.सदर घडलेला प्रकार हा खुनाचा असल्याने कोणत्यातरी अज्ञात कारणाने संबंधित 35 वर्षीय व्यक्तीचा खून करून मृतदेह पाण्यात टाकला असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी स्पष्ट केले. अज्ञात इसमाची हातपाय बांधलेली बॉडी गाथा मंदीर, देहुगाव, येथे इंद्रायणी नदी पात्रात मिळुन आली होती. अज्ञात इसमाचा अज्ञात आरोपींनी अज्ञात करणांकरीता खुन केला असल्याने देहुरोड पोलीस स्टेशन देहुरोड येथे गुन्हा रजिस्टर क्र. 454/2020 भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा, युनिट 5 करीत होते. सदर मयत अज्ञात इसम कोण आहे याची चौकशी करीत असाताना सपोनि राम गोमारे व पो.ना. दत्तात्रय बनसुडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, सदरची डेडबॉडी ही सुनिल नावाचे कामगाराची असुन तो इंद्रायणी नदीचे कडेला शेतात राहत होता. त्याअनुसार सखोल तपास केला असता सदरची डेड बॉडी हि सुनिल रामराव मरजकोले (वय 35 वर्षे) रा. अंतरगाव पालुटी, कळंब, ता. राळेगाव, जि. यवतमाळ, असे असल्याचे निष्पन्न झाले. सदर मयत इसम कोणासोबत राहत होता याची सखोल चौकशी केली असता तो टायगर, पवन, महेंद्र व अजुन एक व्यक्ती यांचेसोबत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर इसमांची गोपनीय बातमीदारां मार्फत माहीती काढुन त्यांचा शोध घेतला असता त्यापैकी टायगर, पवन, महेंद्र यांना सांगुर्डी फाटा येथुन ताब्यात घेतले व त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे अनिकेत ऊर्फ टायगर बाबुराव शिंदे वय 19 वर्षे, रा विठठल रामभाऊ कुंभार यांचे प्लॉटींग इंद्रायणी नदी काठी, देहुगाव, जि. पुणे (मुळ गाव मु.पो. उमरखेड, ता उमरखेड जि यवतमाळ), 2 पवन किसन बोरोले वय 26 वर्षे, रा विठठल रामभाऊ कुंभार यांचे प्लॉटींग इंद्रायणी नदी काठी, देहुगाव, जि. पुणे (रा. आटमोडी, ता. राळेगाव, जि यवतमाळ) 3. महेंद्र विजय माने वय 38 वर्षे, रा विठठल रामभाउ कुंभार यांचे प्लॉटींग इंद्रायणी नदी काठी, देहुगाव, जि. पुणे (मुळ रा. गवळीनगर, गावडे चाळ, भोसरी पुणे) अशी असल्याचे सांगितली. त्यांचेकडे गुन्हयाचे अनुसार चौकशी केली असता त्यांनी काही उपयुक्त माहिती दिली नाही व उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यावर संशय बळावल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण सावंत यांनी आदेश दिल्याप्रमाणे ताब्यात घेण्यात आलेले संशयित इसमांना गुन्हे शाखा, युनिट 5 कार्यालय येथे आणून त्यांचेकडे कसुन सखोल चौकशी केली असता अनिकेत ऊर्फ टायगर बाबुराव शिंदे यांनी गुन्हयाची कबुली दिली व त्याने हा गुन्हा पवन किसन बोरोले वय 26 वर्षे, रा विठठल रामभाउ कुंभार यांचे प्लॉटींग इंद्रायणी नदी काठी, देहुगाव, जि. पुणे रा. आटमोडी, ता. राळेगाव, जि यवतमाळ. महेंद्र विजय माने ,सचिन पुर्ण नाव माहित नाही यांच्या मदतीने केल्याचे कबुल केले.दि. 14 मे 2020 रोजी दुपारी दारू पिण्याचे कारणावरुन झालेल्या किरकोळ वादातुन दि 15 मे 2020 रोजी रात्रौ 12.30 वा च्या दरम्यान मयतास लाथा बुक्क्यांनी तोंडावर पंच मारुन डोक्यात दगड मारुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयताचे हातपाय बांधुन त्यास दगड बांधुन इंद्रायणी नदीपात्रामध्ये टाकुन त्यास जिवे मारले आहे. सदर आरोपींना दाखल केलेल्या गुन्हयाच्या तपासकामी देहुरोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहोत. यातील चौथा आरोपी नामे सचिन पुर्ण नाव माहित नाही त्याचा शोध पोलिस घेत आहेत.अवघ्या 4 तासातच अरोपीच्या मुसक्या युनिट 5 ने अवळल्या गुन्हाचा छडा लावला.सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे मा. श्री सुधिर हिरेमठ, सहा पोलीस आयुकत गुन्हे 2 मा. श्री श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-5 चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत , गुन्हे शाखा, राम गोमारे सहा. पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, फारुक मुल्ला, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार इघारे, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, श्यामसुदर गुट्टे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे, सावण राठोड, गणेश मालुसरे, नितीन बहिरट, राजेंद्र शेटे, राजेंद्र कदम, नागेश माळी यांनी केली.
Home ताज्या बातम्या देहुगाव मधील खुनाचा तपास अवघ्या 4 तासात पोलिसांनी अवळल्या अरोपीच्या मुसक्या !...