Home ताज्या बातम्या कार्यक्षम नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्या पुढाकाराने विकास नगर मध्ये कम्युनिटी किचन

कार्यक्षम नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्या पुढाकाराने विकास नगर मध्ये कम्युनिटी किचन

0

विकासनगर,दि.८ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने अनेक लेबर कामगार ज्यांच्या हातावर पोट आहेत गाव राज्य जिल्हा हा सोडून आले परप्रांतीय मजूर यांचे होणारे हाल व त्यांना एक मदतीचा हात म्हणून बाळासाहेब ओव्हाळ हे लॉक डाऊन सुरू झाल्यापासून अन्नधान्याचे किट वाटप करत आहेत पण लॉक डाऊन अजून वाढत चालल्याने लोकांची होणारी उपासमार पाहता चिंचवड विधानसभेचे कार्यक्षम आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कार्यक्षम नगरसेवक बाळासाहेब ओहाळ यांच्या पुढाकाराने 28 एप्रिल पासून कम्युनिटी किचन विकास नगर मध्ये सुरू करण्यात आले आहे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्याशी प्रजेचा विकासचे संपादक विकास कडलक यांनी बातचीत केल्यानंतर नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ म्हणाले मी ही सेवा निस्वार्थ भावनेने माझे कर्तव्य समजून एक मदतीचा हात सर्व गरजूंपर्यंत पोचवत आहे कोणतीही प्रसिद्धी न करता शांतपणे काम करत आहे कोण काय म्हणत आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतः काय करत आहोत याकडे लक्ष द्यावे ह्या हेतूने काम करत राहिल्यास मनाला समाधान मिळते माझा मतदार असो किंवा नसो पण तो प्रभागात आहे आणि उपाशी आहे त्याला उपाशी राहून देणार नाही हे आमचे मार्गदर्शक वंदनीय कार्यक्षम आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या सूचनेचे पालन करत आम्ही अखंडपणे सेवा करत प्रभागात कोणी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेत हे कम्युनिटी किचन सुरू केले आहे ह्या प्रभागांमध्ये आपल्या प्रजेच्या विकास च्या माध्यमातून मी जनतेला आव्हान करतो जर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी उपाशी राहत असेल किंवा तिथपर्यंत कोणती सोय पोचत नसेल तर शिंदे पेट्रोल पंप च्या बाजूला इंद्रप्रभा सोसायटी शॉप लाईन मध्ये माझे संपर्क कार्यालय आहे आपण तेथे येऊन भेट द्यावी किंवा आॅनलाईनच्या माध्यमातुन आपल्या अडचणी सांगावे मी नक्कीच त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन आपल्या भागात आपण प्रत्येक एरियातून सर्व लोकांची लिस्ट घेऊन त्या लोकांच्या पैकी कोणी एक किंवा दोन व्यक्ती ऑफिस पाशी येऊन रोज दुपारी साडेबारा ते दोन आणि रात्री साडेसात ते साडेआठ यादरम्यान अडीच ते तीन हजार लोकांचे जेवण घेऊन जातात आणि त्यांच्या परिसरामध्ये हे सर्वांना वाटप करून जेवण करतात त्यामुळे त्यांना आधार मिळत आहे आणि ते घरातून बाहेर न येता या कोरोणाशी लढा देण्यासाठी सक्षम पणे शासनाला साथ देत आहेत आपणही आपले येथील कोणी जर उपाशी राहत असेल तर आपल्या ऑफिसपर्यंत संपर्क साधावा आणि तो ती व्यक्ती उपाशी राहणार नाही याचे आपण सर्वजण प्रभागात काळजी घेऊया पुढील शासनाचा निर्णय येईपर्यंत आपण कोणीही बाहेर पडू नये काळजी घ्या जर खूप अत्यावश्यक गरज असेल तरच बाहेर पडा खरच कुठे बाहेर जायचं असेल तर पास घ्या आणि गर्दी टाळा या कोरोणाला पळवा असे मत नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी व्यक्त केले

Previous articleधक्कादायक प्रकार! औरंगाबादमध्ये १६ मजूरांचा रेल्वे मालगाडीखाली चिरडून मृत्यू तर ३ जण जखमी.
Next article2500-3000 लोकांची जेवणाची सोय कम्युनिटी किचन मधुन करत अहोत-नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 + nineteen =