देहुरोड,दि.३ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-कोरोना- देहरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत दिनांक २७ एप्रिल२०२० रोजी लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे(हॉटस्पॉट झोन)च्या ठिकाणावरून स्वतःच्या वाहनाने शिवाजीनगर, देहूरोड येथे एका कुटुंबात काही व्यक्ती आल्याचे आढळून आले. सदर कुटूंबातील दोन मुलींचा कोविड-१९ चा रिपोर्ट हा पॉझिटिव आला व त्यानंतर तत्काळ कॅन्टोन्मेंट बोर्डाची वैधकीय टिम व पोलीस प्रशासन सतर्क झाले असुन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाची २४ तास हेल्पलाईन दिनांक ०१ मे २०२० पासून सुरु करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईनचा नंबर ९३७०९५०८३५ असून कोरोना बाबत कोणत्याही प्रकारची सुचना व माहितीसाठी व कोणी अनोळखी आढळल्यास या कमांकावर संपर्क साधावा .देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हे Containment Zone घोषित असल्यामुळे , त्याचप्रमाणे देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील शिवाजीनगर झोपडपट्टी भागात दोन कोरोना पॉझिटिव्ह केसेस आढळल्याने भविष्यात कोराना विषाणू चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने आता काही निर्णय घेतले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रामस्वरूप हरितवाल यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे दिली .किराणा दुकाने तसेच चिकन – मटण विक्री प्रत्येक आठवडयात फक्त सोमवार , मंगळवार व बुधवार या दिवशी सकाळी०९ .०० वा.पासुन ते दुपारी ०१ . ०० वा. पर्यत चालु राहतील पुढचे आदेश येई पर्यंत सुरू राहतील .भाजीपाला , फळविक्री मार्केट पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत .औषधे , दुध विक्री व हॉस्पीटल सेवा ही नेहमी प्रमाणे चालू राहतील . स्वस्त धान्य दुकाने , पेट्रोल पंप , गॅस एजन्सी , बँका या सारख्या अत्यावश्यक सेवा सरकारी आदेशाप्रमाणे सुरू राहतील .तरी सर्व नागरिकांनी सदर बंद चे पालन करावे व सर्वानी कोरोना विषयी आपल्या कुटूबांची काळजी घ्यावी व कोणीही घरातून बाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन ही मुख्य कार्यकारी अधिकारी हरितवाल यांनी केले .
Home Uncategorized कोरोना-देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत,किराणा दुकाने, चिकन – मटण विक्री आठवड्यातुन सोमवार,मंगळवार व...