देहूरोड,दि.१ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-मावळातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने अजुन सतर्क व्हावे व या संकवरही मात करुया,मावळ तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नव्हता. पण, पुण्यातून देहूरोड येथे आलेल्या एका कुटुंबातील दोन मुलींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. मात्र, प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून तालुक्यातून कोरोनाला आम्ही हद्दपार करणार आहोत, असा निर्धार आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड येथे आमदार शेळके यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी प्रशासकीय आणि आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. आमदार शेळके म्हणाले की, रुग्णवाहिका, औषधे, बेडची व्यवस्था इतर सुविधांची उपलब्धता याबाबत प्रशासन सतर्क आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने एम. बी. कॅम्प शाळेत 100 बेडचे विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. तसेच, देहूरोड शहराचे दहा विभाग तयार करून कॅन्टोन्मेंटचे दोन अधिकारी, एक पोलिस कर्मचारी व इतर टीम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजनबद्ध देखरेख करणार आहेत.टॉयलेट तीन वेळा क्लीन करून तीन वेळा सॅनीटायझर नी फवारणी करणे तसेच सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत भाजी मार्केट फळविक्रेते किराणा दुकान चिकन मटण विक्रेते या वेळेतच खुले राहतील दुपारी एक नंतर संपूर्ण बंद म्हणजे बंद असेल देहुरोड मधील 10 भाजी विक्रेत्यांना पास दिले जातील त्यासोबत डिलिव्हरी बॉय हे व्हाॅट्सअप नंबर आणि मोबाइल नंबर वर भाजीचे बुकिंग घेतील आणि घरपोच भाजी होती दुपारी एक नंतर बाहेर सर्व बंद असेल फक्त मेडिकल चालू राहतील 10 टेम्पो भाजी वाल्यांना पाच राहतील 100 बेड रूम मध्ये सी.सी टि.व्ही लेडीज जेंट्स टॉयलेट सेपरेट, कॅरम, सर्व सेंटर बनवण्याच्या दृष्टीने पावले उचलावी या वर चर्चेत भर दिला. उचलली गेलीत कम्युनिटी किचन बद्दलही आमदार शेळके यांनी बोलले ज्याला खूप गरज असेल अशा लोकांना जेवण पुरवले पाहिजे त्याचेच यावेळी देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर सर हे उपस्थित होते त्यांनाही दुपारी एक नंतर जर कोणी बाहेर सापडल्यास आढळ्यास पोलिसांनी कोणतीही घाई करू नका डायरेक्ट त्यांच्यावर कारवाई करा अशा सूचना दिल्या.देहूरोडकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासन गांभीर्याने काम करीत आहे. प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार शेळके यांनी केले.
पालकमंत्री व उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांनी घेतला आढावा…
मावळ तालुक्यात आजवर एकही कोरोनाबाधित आढळला नाही. पण, देहूरोडमधील एक भाजीविक्रेता पुणे शहर परिसरात राहणाऱ्या कुटुंबियांना देहूरोडमध्ये पहाटे टेम्पोमधून घेवून आला. त्यांची तपासणी केली असताना त्या कुटुंबातील दोन मुली कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, पालकमंत्री अजित पवार यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. देहूरोड कॅन्टोमेंट हद्दीत ज्या सुविधा मिळत नाहीत. त्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अत्यावश्यक सुविधा देहूरोडमध्ये पुरवाव्यात, याबाबत आदेश दिले आहेत. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही करीत आहोत. नागरिकांनी आजपर्यंत जसे नागरिकांनी सहकार्य केले. तसे यापुढेही करावे. संबंधित कोरोनाबाधित मुली लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या २२ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत,ते निगेटिव्ह आल्याने सुखद बातमी मिळत आहे,तरीही शासनाच्या सुचनाचे पालन सर्वानी करावे असेही आमदार शेळके यांनी सांगितले.