दिल्ली,दि.26 एप्रिल 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-‘भारतातील कोरोनाविरोधातील लढा हा जनताकेंद्री आहे. देशात महायज्ञ सुरु असल्याची स्थिती दिसत आहे. प्रत्येक जण आपल्या सामर्थ्य ओळखून लढा देत आहे.
भारतासारखा मोठा देश कोरोनाविरुद्ध निर्णायक लढाई लढत आहे. देशातील सर्व नागरिक या लढाईचे नेतृत्व करत आहे. आज पूर्ण देश एकाच लक्ष्यावर चालला आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
‘देशातील कोणीही नागरिक उपाशी राहता कामा नये. तुमच्या हृदयातील भावना कोरोनाविरोधातील लढाईला बळ देत आहेत, कोणी मास्क बनवतं आहे तर कोणी सबसिडी सोडत आहे, कोणी पेन्शन तर कोणी पुरस्काराची रक्कम पीएम निधीला देत आहे, त्यामुळे देशातील प्रत्येक नगारिक या लढाईला ‘पीपल ड्रिव्हन’ बनवत आहे,’ असेही मोदी म्हणाले.
कोविड19- लढवय्ये एकत्र
या माध्यमातून सव्वा कोटी डॉक्टर, नर्स, प्रशासन, आशा सेविका असे अनेक कोविड19 लढवय्ये एकत्र जोडले गेले आहेत. जर तुम्हाला देशाची सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही यासोबत जोडू शकता, असेही मोदींनी यावेळी सांगितले.
प्रत्येक लढाई काही ना काही शिकवून जाते. या लढाईमुळे तुम्ही जी स्वंयशिस्त दाखवली ती उल्लेखनीय आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील प्रत्येक जण यापासून मुक्तेतसाठी झटत आहे. हे दिवसरात्र मेहनत करत आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी सर्वांचे आभार मानले.
हे सर्व कोविड योद्धा
लाईफलाईन उडान नावाची एक योजना सुरु आहे. त्याद्वारे कोट्यावधींचे धान्य, गरजेच्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवता येत आहेत. त्यासाठी 100 हून अधिक पार्सल ट्रेन चालवले जात आहे. नागरी उड्डाण आणि रेल्वे विभागातील कर्मचारी सहभागी, 500 टन वैद्यकीय साहित्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवत आहेत, हे सर्व कोविड योद्धा आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अनेकांच्या खात्यात थेट रक्कम जमा झाले आहेत. गरीबांना तीन महिने मोफत सिलेंडर दिले जात आहे. बँकिंग क्षेत्रातील कर्मचारीही दिवस रात्र काम करत आहे. राज्य सरकारही उत्तम काम करत आहे. त्यांचीही मी प्रशंसा करु इच्छितो, असेही मोदी यावेळी म्हणाले
कोविड वॉरिअर्सवर हल्ला
करण्यांविरुद्ध कठोर कारवाई
आपण या लढाईदरम्यान समजाला, नागरिकाला आजूबाजूला बघण्याचा व्यापक दृष्टीकोन मिळाला आहे. घरात काम करणारे लोक असू दे, आजूबाजूचे किंवा इतर नागरिकांमार्फत आपल्याला हे बघायला मिळत आहे. डॉक्टर, रिक्षा चालक, भाजी मंडईत काम करणाऱ्या लोकांविषयी आपले जीवन व्यर्थ आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
डॉक्टर, नर्स, निमवैद्यकीय क्षेत्र अशा कोविड वॉरिअर्सवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करण्यासाठी अध्यादेश आणला. पोलिस, सफाई कर्मचारी यांच्याविषयी जनतेचा दृष्टीकोन बदलला आहे. पोलीस गरजूंना अन्न आणि औषध देत आहेत, यामुळे पोलिसांशी भावनिक नातं जोडलं आहे. पोलीस ज्याप्रकारे समोर येत आहे ते उल्लेखनीय आहे. ज्याप्रकारे आपण या लढाईत लढत आहोत हे फार महत्त्वाचे आहे, असेही मोदींनी यावेळी म्हटलं.
थँक्यू पीपल ऑफ इंडिया
जेव्हा आपली हक्काची गोष्ट सोडून काही लोकं दुसऱ्याची मदत करतात, तेव्हा त्याला संस्कृती म्हणतात. भारताने जगभराला औषध पुरवठा केला आहे. कोरोना संकटात भारताने इतर देशांना औषधं दिली नसती, तर कोणी दोष दिला नसता.
मात्र आपण प्रकृती-विकृती न मानता संस्कृतीचं दर्शन घडवलं आणि औषधांची मदत पोहोचवली, भारताच्या आयुर्वेद आणि योग यांची चर्चा देशभरात केली जात आहे. अनेक देशांनी थँक्यू इंडिया, थँक्यू पीपल ऑफ इंडिया असे म्हटलं. तेव्हा मला देशातील प्रत्येक नागरिकाचा अभिमान वाटला, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
कोरोनामुळे या गोष्टी बदलल्या
भारताच्या युवा पिढीला या लढाईला स्विकारावं लागणार आहे. आपल्याला काही तरी करुन दाखवावं लागणार आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यातील पहिला म्हणजे मास्क घालण आपल्या चेहरा झाकणे. याची आपल्याला सवय नाही. पण याचा अर्थ नाही की कोणी आजारी आहे,असे नाही. यामुळे तुमचे सरंक्षण होते.
सार्वजनिक ठिकाणी थुकंणे हे चुकीचे आहे असे अनेकदा सांगण्यात आलं होतं. मात्र ही समस्या जात नव्हती. मात्र आता ती वेळ आली आहे की आता रस्त्यावर थुंकणे बंद केले पाहिजे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही.
आजचा दिवस अक्षय्य तृतीयेचा, आपली धरती, पर्यावरण अक्षय्य राहील, असा संकल्प करुया, आपल्याला ही लढाई कितीही कठीण वाटत असली तरी लढावी लागणार आहे. हे दिवस कायम लक्षात राहणार आहे.
कोरोनामुळे सणांचे स्वरुप बदललं
सध्या रमजानही सुरु आहे. गेल्यावेळी रमजानच्या दरम्यान कोणीही पुढच्या वर्षी असे काही होईल याचा विचारही केला नसेल. रमजानच्या या दिवसात आपण घरी बसून ही लढाई अजून मजबूत करु. रमझानच्या महिन्यात संयम, संवेदनशीलता याचं दर्शन घडवूया, ईदच्या आधी जगातून कोरोना नष्ट होईल, याचे प्रयत्न करूया, असेही मोदी म्हणाले.
या कोरोनामुळे देशाने अनेक सणांचे स्वरुप बदलले आहे. देशातील नागरिकांनी घराच्या बाहेर न पडता हे साजरे केले आहे. सर्वांनी आपले सण साजरे घरात राहून साजरा केला यामुळे आपण कोरोनाची लढाईला सामोरे जाऊ शकतो, असेही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.
आपल्या शहर, गाव, ऑफिस, गल्लीत कोरोना पोहोचला नाही, म्हणजे तो कधीच येणार नाही, असा अतिआत्मविश्वास बाळगू नका, जगाचा अनुभव पाहून आपण शिकलो आहोत, नजर हटी, दुर्घटना घटी, अतिउत्साहात निष्काळजी दाखवू नका. आपल्याकडे नजर हटी दुर्घटना घटी असे सांगितले जाते. त्यावर नक्की लक्ष ठेवा, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
दो गज दुरी, बहोत हे जरुरी
‘भारतात कुठेही लापरवाही होऊ नये याची काळजी घ्या. दो गज दुरी, बहोत हे जरुरी, असा मंत्र नक्कीच लक्षात ठेवा.’
‘पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा यापासून मुक्त होण्यासाठी काही बातमी असावी, आपण या कोरोनापासून बाहेर येऊ, या प्रार्थनेसोबत मोदींनी मन की बातचा शेवट करत निरोप घेतला,
मोदींना या कार्यक्रमात मांडलेले प्रमुख मुद्दे
1. भारतातील प्रत्येक नागरिक आज कोरोनाचा सामना करत आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईचं नेतृत्व करत आहे. भारतात कोरोनाची लढाई पीपल ड्रिव्हन अर्थात लोकाभिमुख आहे.
2. शेतकरी शेतात काम करून आपल्याला अन्न पुरवत आहेत. कुणी शेतातील भाजीपाला मोफत देत आहे, तर कुणी मास्क पुरवत आहेत. काही मजूर लोक ज्या शाळेत थांबलेत तिथं रंगरंगोटी करत आहेत. हीच ती पीपल ड्रिव्हन लढाई.
3. Covidwarriors.gov.in या व्यासपीठाच्या माध्यमातून सरकारनं डॉक्टर, आशा, NCC यांना एकत्र जोडण्यात आलं आहे. तुम्हीही कोव्हिड वॉरियर बनू शकता.
4. देशातल्या सगळ्या भागात औषधीपुरवण्यासाठी ‘लाईफलाईन उडान’ हा कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत 500 टनांहून अधिक औषधी देशाच्या वेगवेगळ्या भागात पुरवण्यात आली आहे.
5. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत.
6. कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना इजा पोहोचवल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
7. आता आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांविषयीच्या आपल्या मानसिकतेत बदल होत आहे. कोरोनाच्या लढाईत लोक पोलिसांशी भावनात्मक पातळीवर जोडले गेले आहेत.
8. इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आज भारताचे आभार मानत आहेत. तेव्हा मान अभिमानानं उंचावते.
9. कोरोनाच्या काळात आयुष मंत्रालयानं रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात गरम पाणी पिणे, काढा पिणे असे अनेक उपाय सांगितले आहेत. याचा अवलंब केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
10. जगानं योगाला ज्यापद्धतीनं स्वीकारलं, त्यापद्धतीनं लवकरच जग आयुर्वेदाचा स्वीकार करेल. तरुणांनी आजच्या भाषेत आयुर्वेद जगापर्यंत पोहोचवायला हवा. आता मास्कविषयीची आपली मानसिकता बदलत आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय सोडली पाहिजे.
11. आज अक्षय्य तृतीयेचा दिवस. पांडवांना अक्षय पात्र मिळालं होतं. अन्नदाता शेतकरी काम करत आहेत. नवं काही सुरू करण्याचा दिवस आहे. धरतीला अविनाशी बनवण्याचा संकल्प घेऊ शकतो. बसवेश्वर यांच्या तत्वांतून शिकण्याची संधी मिळाली. जैन परंपरेतही आजच्या दिवसाचं मोठं आहे. रमझानचा पवित्र महिना सुरू आहे.
12. अति आत्मविश्वासाने वागू नका. आपल्या घरा,कचेरी, परिसरात आतापर्यंत कोरोना आला नाही म्हणून बेसावध राहू नका. सावधानी हटी तो दुर्घटना घटी असं पूर्वज म्हणत असत. कोरोनाचा समूळ बीमोड होणं आवश्यक आहे. जराही बेपर्वाई दाखवू नका. अतिशय काळजी घ्यायला हवी. दो गज दूरी, है बहुत जरूरी
13. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन एकमेकांच्या समन्वयाने काम करत आहेत.
14. आपल्याला सेवा पुरवणाऱ्या बांधवांच्या योगदानाची किंमत आपल्याला कळते आहे. त्यातूनच स्वच्छता कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी होतोना दिसते आहे.
15. प्रकृती, विकृती आणि संस्कृती या संकल्पनांना एकत्रित समजून घ्या. कोरोना संकटात जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन आपल्याला मिळाला आहे. स्वत:पेक्षा इतरांचं हित समजून घेणं आपली संस्कृती आहे.