पिंपरी,दि.२७ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-सतीश कदम):- सध्या संपुर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे जन जिवन विस्कळीत झाले असून आज या कोरोनाशी लढण्यासाठी लाँकडाऊन करणे अती आवश्यक होते, त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने तात्काळ हा निर्णय घेतला आहे.पण या मध्ये सर्व सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.आज पर्यंत मराठी माणसाने प्रत्येक संकटांना एकञ येऊन तोंड दिले आहे.पण अशा परिस्थितीत काही किराणा दुकानदार आणि भाजी विक्रेते, मेडिकल इत्यादी दुकानदार मोठ्या प्रमाणात दर वाढवून नागरिकांनी ञास देत आहेत.अशी खंत शिवसेनेचे अरुण जोगदंड यांनी व्यक्त केली.
सध्या सर्वत्र बंदीचे वातावरण जरी असले तरी जीवनावश्यक मालाची आवक सुरू आहे. मात्र काही दुकानदार हे मालाची साठेबाजी करीत आहे, नागरिकांना वाजवीपेक्षा दुप्पट तिप्पट दराने आपल्या जवळील माल विकत असल्याच्या तक्रारी येत आहेत दुकानदारांनी नागरिकांची फसवणूक करु नये, आहे त्याच किमंतीला आपल्याकडील माल विकावा असे आवाहन जोगदंड त्यांनी दुकानदारांना केले आहे. जर कोणी दुकानदार अशाप्रकारे नागरिकांची फसवूणक करीत असेल तर शिवसेना खपवून घेणार नाही असेही अरुण जोगदंड यांनी स्पष्ट सांगितले
या संदर्भात अरुण जोगदंड यांनी ग्राहक संरक्षण केंद्राकडे तक्रार केली आहे.तसेच या संकटकाळात लोकांनी माणुसकी जपत लोकांना मदत करावी,कारण या कोरोनाला रोखण्यासाठी आचारसहिता सारखी परिस्थिती असल्याने लोकांचा रोजगार बंद होऊन घरात बसावे लागत आहे.त्यामुळे लोकांची आर्थिक पिळवणूक बंद करण्यात यावी.तसेच कोणी आढळ्यास मला फोन करा.(अरुण जोगदंड-9527488396)
संपूर्ण देश हा एका भीतीच्या वातावरणातून जात आहे. या परिस्थीतीचा सामना करण्यासाठी केंद्रशासन, राज्यशासन, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या पध्दतीने नागरिकांची काळजी घेत आहे. घरी राहण्याचे आवाहन करीत आहे. नागरिकांच्या या परिस्थीतीचा फायदा दुकानदारांनी घेवू नये व आपल्याकडील माल आहे त्याच किंमतीला विकावा, असे आवाहन अरूण जोगदंड यांनी केले आहे, जर नागरिकांकडून अशा दुकानदारांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या तर नाईलाजाने दुकानदारांवर कारवाई करावी लागेल असा इशाराही जोगदंड यांनी दिला आहे,
Home ताज्या बातम्या किराणा दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांनी संकटकाळात भाव न वाढवता माणुसकी जपावी –...