देहुरोड,दि.२४ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- सरकारी निर्देशांबाबत नागरिकांच्या अनास्थेमुळे अखेर राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव (कोविड-19) रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी (कर्फ्यु) लागू करण्याचा निर्णय घेतला,खर पण सरकारचा आदेश जुगारुन नागरीक रस्त्यावर अखेर नाइलाजस्तव देहुरोड पोलिसांनी दिला महा प्रसाद, ही काही मौजमजेची वेळ नाही. तरीही नागरिक रस्त्यावर काय सुरु आहे, हे बघण्यासाठी बाहेर येतात. आज सकाळपासून रस्त्यांवर अनेक वाहने विनाकारण बाहेर पडल्याचे दिसून आले.आठ जनांनवर पोलिसांनी कारवाही पण केली,या शिवाय भाजी मार्केट ठरावीक भाजी फळवाले या ठिकाणी लोक गर्दी करत असल्याने ,व्यापारी वर्गाशी बोलणे करुन गर्दी होऊ नये म्हणुन भाजीचे दुकाने तरकारी फळे वाले यांना सकाळी ६ ते १० वा.तर राञी १० ते १२ अशी वेळत उघडे ठेवावी अशी माहीती फोन वरुन पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली.
पोलीस ठिकठिकाणी नाके बंदी करुन वाहनाची व लोकांची चौकशी करुन बाहेर पडु नका कोरोनो व्हायरस खुप घातक आहे आटोक्यात आणण्यासाठी प्रयन्त करुयात,सर्वानी सहकार्य करा अन्यता गय केली जाणार नाही,कार्यवाही करण्यात येईल असे समजावत होते, देहुरोड सेंट्रल,पोलिस स्टेशन समोर,सवाना हाॅटेल ब्रिज खाली, मुकाई चौक,विकासनगर,साईनगर,आर्शनगर,सर्व ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली असुन बिट मार्शल सर्व ठिकाणी फिरुन लोकांना घरात बसा बाहेर येऊ नका,स्वताला व देशाला कोरोनो पासुन वाचवण्यासाठी काळजी घ्या घाबरु नका सांगत आहे,तर देहुरोड कॅन्टोमेन्ट परिसरात औषध फवारणी केली गेली,व सी ओ च्या आदेशाने गर्दी होऊ नये म्हणुन काही देहुरोड बाजारातील किरकोळ व तरकारी फळ वाल्याने दुकाने उघडण्यास सांगितले गेले,राज्यातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण होऊ नये, यासाठीही राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे अजूनही कोरोनापासून सुरक्षित आहेत. या संचारबंदीच्या (कर्फ्यु) काळात जीवनावश्यक वस्तू, औषधांचे कारखाने आणि या सगळ्याची ने-आण करणाऱ्या व्यवस्था सुरु आहे, खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी सुरु असुन. रिक्षात चालक सोडून एकजण आणि टॅक्सीत चालक वगळता दोन जणांना बसण्यास परवानगी असुन, जीवनावश्यक वस्तूंसह पशुखाद्याची दुकानेही सुरु आहेत. अनेकांच्या घरी पाळीव प्राणी असल्याने हा निर्णय, कृषीमालाची वाहतूकही सुरु आहे.सर्व धर्मीयांचा प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद होती.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर डॉक्टरांबरोबरच नर्स आणि अन्य मनुष्यबळ कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशा, अंगणवाडी सेविका आणि होमगार्डच्या जवानांनाही वैद्यकीय प्रशिक्षण दिले जात आहे.आपण निर्णायक टप्प्यावर आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव आत्ताच रोखला नाही तर हा विषाणू जगात घातले तसे थैमान राज्यातही घालेल, घरी विलगीकरण केलेल्यांनी सूचना पाळाव्यात. जनतेच्या हितासाठीच कठोर पावले उचलत आहोत.आशा, अंगणवाडी सेविका आणि होमगार्डच्या जवानांनाही वैद्यकीय प्रशिक्षण दिले जात आहे. जनता कर्फ्युला जनतेने दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पण केवळ टाळ्या, वाजवणं म्हणजे व्हायरस पळवणे नव्हे. जीवाची बाजी लावून लढण्याऱ्यांसाठी ते होते.हा निर्णायक टप्पा आहे. पुढचे दिवस महत्वाचे आहेत, हे ओळखलं आहे तर आपण मिळून वेळेचा उपयोग करुन या वर मात करता येईल.
Home ताज्या बातम्या सरकारचा आदेश जुगारुन नागरीक रस्त्यावर अखेर नाइलाजस्तव देहुरोड पोलिसाना द्यावा लागतोय महाप्रसाद