लातुर,दि.२२ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास लातूर जिल्ह्यातील नागरीकांनी, व्यापाऱ्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील गावागावात कडकडीत बंद पाळण्यात आला.लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी दोन दिवस सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिलेले होते परंतु शनिवारी दुपारपर्यंत दुकाने, आस्थापना सुरू होते. रात्री गोलाईमधील बाजारातही मोठी गर्दी झालेली होती.परंतु आज सकाळ पासून मात्र लोकांनी घराच्या बाहेर पडणार नाही हा निश्चय केलेला दिसून येत होता. शहरात चौकाचौकात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले होते. मधूनच दुचाकीवर कांही युवक बंद पाहण्यासाठी फिरत असल्याचेही दिसून येत होते. लातूर शहरास जिल्ह्यात जनता कर्फ्युला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.किल्लारी – औसा तालुक्यातील किल्लारी येथील नागरिकांकडून जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.किल्लारीसह परिसरातील नागरिकांनी काल दुपार पासूनच आपले दुकान बंद केले आहेत. तसेच आज सकाळी पासून एकही वाहन रस्त्यावर किंवा चौकात दिसले नाहीत. सकाळी 7 वाजल्यापासून पासून गजबजलेले दिसणारी ठिकाणे आज ओस पडलेली दिसून आली. किल्लारी पोलीस यांच्याकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आह.निलंगा – निलंगा शहरासह तालुक्यातील सर्व गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यवहार ठप्प होते.औराद शहाजानी, अंबुलगा (अ.बु.), हलगरा, कासार सिरसी, का.बालकुंदा, बोरसुरी व इतरही गावातही कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळाला.निलंगा शहरातील बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, औराद रोड, आनंदमुनी चौक, लातूर रोड सह शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने दिलेल्या आवाहनाला निलंगेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला.औराद शहाजानी येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व बाजारपेठ बंद होती. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. गावातील व शहरातील रस्त्यांवर एकही माणुस दिसत नव्हता.नळेगाव – कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी पुकारलेल्या एक दिवशीय जनता कर्फ्युला नळेगावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारपेठ पुर्णतः ठप्प ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. रस्त्यावर एक सुद्धा नागरिक दिसू नये यासाठी गोविंद राठोड, गणेश बुजारे, अविनाश शिंदे आदी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त करत होते.वडवळ नागनाथ येथे प्रतिसाद वडवळ नागनाथ – कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांना वडवळ नागनाथ येथील नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. गुरुवार पासून येथील आरोग्य विभागाने, आशा कार्यकर्त्यांनी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत यांच्यासह सर्व शाळेच्या शिक्षकांनी घरोघरी जाऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्रित न येण्याचे आवाहन करून रविवारी २२ मार्च रोजी सकाळी सात ते सायंकाळी नऊ पर्यंत होत असलेल्या जनता कर्फ्युमध्ये सहभागी होण्यासाठी जनजागृती केली.रविवारी सकाळपासुन व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून, नागरिकांनी, सर्व दैनंदिन कामकाज बंद ठेवून जनता कर्फ्युला १०० टक्के प्रतिसाद दिला.कोरोनाच्या भीतीने गाव, वाड्या, तांडे ओसाड नांदुर्गा – राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राबविण्यात येत असलेल्या जनता कर्फ्युला नांदुर्गा, गुबाळ, मंगरूळ, गांजनखेडा, लिंबाळा, नांदुर्गा तांडा, परिसरात बंदला जनतेने चांगल्याप्रकारे प्रतिसाद दिला असून सर्व गावातील हॉटेल, टपऱ्या, दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.अहमदपूरात जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसादको व्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्युचे अहमदपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी घरातच बसून स्वागत केले. दवाखाने, मेडीकल वगळता सर्वच व्यावसायिकांनी आप-आपली दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला. त्यामुळे मुख्य रस्त्यासह कॉलनीतील रस्त्यावरही शुकशुकाट पहावयास मिळाला.अहमदपूर शहरासह तालुक्यातील शिरुर ताजबंद, हडोळती, किनगाव, अंधोरी, खंडाळी, सताळा, कुमठा, ऊजना, थोडगा, कोपरा, वळसंगी या गावासह छोट्या मोठ्या गावातील नागरिकांनी जनता कर्फ्युचे स्वागत करून सकाळी ७ वाजल्यापासून बंद पाळण्यास सुरुवात केली.जळकोट शहर व तालुक्यात कडकडीत बंद जळकोट शहर आणि तालुक्यात २१ आणि २२ मार्च असे दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. जळकोट शहर व तालुक्यातील प्रत्येक गावात २२ रोजी जनता कर्फ्युचे पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहर व तालुक्यात किराणा दुकान, कापड दुकान, पान टपरी, भाजी मार्केट, आडत दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा – महाविद्यालयातील विद्याथ्र्यांना आधीपासूनच सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे शहर व तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट होता. दवाखाने व मेडिकल या अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याने बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. या जनता कर्फ्युसाठी पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदिश सूर्यवंशी, जळकोटचे नगराध्यक्ष किशन धुळशेट्टे, मुख्याधिकारी उज्ज्वला शिंदे, नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी व कर्मचारी, विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते, व्यापारी असोसिएशन, पत्रकार यांनी या कामी मोलाची भूमिका पार पाडली कडकडीत बंद औसा शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात शासनाच्या आदेशाचे पालन करण्यात आले. शहरवासियांनी काल थोडीफार हनुमान मंदीर परिसरात गर्दी केली होती पण २२ मार्च रोजी केंद्र सरकारने केलेल्या जनता कर्फ्युला आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या आवाहनाला जनतेने पाठिंबा दिला असून २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्यापासून औसा शहर पुर्णपणे बंद होते.उदगीर मध्ये जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद उदगीर शहरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला कोरोना वायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. त्याला उदगीर मध्ये नागरिकांनी शंभर टक्के उस्फुर्त प्रतिसाद देत सर्व दुकाने व्यापार बंद ठेवले.सांय ५.००ताट वाजवुन टाळ्या वाजवुन जनता जनता कर्फ्यु मध्ये परिश्रम घेतलेल्यांचे नाद व्यक्त केला.