पिंपरी,दि.१४ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दि.१२ मार्च २०२० रोजी ०२ प्रवासी
रुग्णाना करोनाचे संशयित म्हणून दाखल करून घेण्यात आल्याने खळबळ उडाली. त्यांचे घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही,पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले होते. सदर ०२ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधून घरी सोडणेत आले.दि.११ मार्च २०२० रोजी करोना आजाराकरीता दाखल केलेल्या ०३ पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असून रुग्णांवर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. सदर रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व इतरांची माहिती घेवून त्यांनाही होम क्वॉरटाईनमध्ये ठेवणेत आले आहे आणि त्यांचे नमुने तपासणीसाठी एन.आय.व्ही.पुणे येथे पाठविण्यात आलेले आहेत.
सद्यस्थितीत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये करोना विलगीकरण कक्षामध्ये १० खाटांची व्यवस्था करणेत आलेली आहे.दि.१३ मार्च २०२० रोजी पिं.चिं.मनपाचे नविन भोसरी रुग्णालय येथे ६० खाटांचे विलगीकरण (Isolation) कक्ष पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आलेआहे.४१ व्यक्तींचे स्वॅब तपासणी कामी एनआयव्ही. पुणे येथे तपासणीस पाठविण्यात आले आहेत.नविन भोसरी रुग्णालय येथे आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष (आण्णा) लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी पक्षनेते एकनाथ पवार, अतिरीक्त आयुक्त संतोष पाटील, आति.आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे,अधिष्ठता डॉ.राजेंद्र बाबळे, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ.शंकर जाधव, क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे,
महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे यांनी पाहणी केली व अनुषंगाने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना कामकाजाबाबत सुचना दिल्या, तसेच महापालिकेचे मासुळकर कॉलनी येथील नविन रुग्णालयामध्येही कारटाईन (Quarantine)कक्ष तयार करणेकरीता पाहणी केली असून यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सुचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या.तसेच दि.१३मार्च २०२० रोजी आयएमए, आयएपी, निमा, पीसीडीए या सर्व वैद्यकीय संघटनांचे अध्यक्ष यांची सभा घेवून सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना करोना संशयित रुग्णांची माहिती त्वरीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय मुख्य कार्यालयास देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मनपाचे सर्व जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय यांचीही बैठक घेवून त्यांनाही आवश्यक सुचना दिल्या.तसेच आपतकालीन परिस्थितीकरीता महापालिका अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असण्याच्या दृष्टीने उपाय योजना करणे आवश्यक असल्याने महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयातील व सर्व विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या दि.३१ मार्च २०२०पर्यंतच्या वैद्यकीय अत्यावश्यक रजा वगळून सर्व रजा विभाग प्रमुखांनी मंजुर करु नयेत असे आदेश देण्यात आले. तसेच या पूर्वी रजा मंजूर करून रजेवर गेलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून त्या सर्व अधिकारी/कर्मचारी
यांनी त्वरीत कार्यालयात रुजू व्हावे असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. महानगरपालिकेचे
अधिकारी/कर्मचारी यांनी सुट्टीचे दिवशी देखील कार्यालयाचे परवानगी शिवाय महापालिका कार्यक्षेत्र सोडू नये याबाबतची सर्व कार्यवाही संबंधित विभागप्रमुखांनी करावी असेही त्यांनी आदेश दिलेले आहेत.पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्व शासकीय सार्वजनिक कार्यक्रम दि.३१मार्च२०२० पर्यंत रद्द करण्याचे आदेशही आयुक्त
श्रावण हर्डीकर यांनी निर्गमित केलेले आहेत.पिं.चिं.मनपामार्फत हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८०६६६६ हा आहे.करोना आजारा संबधित कोणतेही प्रश्न असलेस सदर हेल्प लाईनवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Home ताज्या बातम्या करोनो मुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्व शासकीय सार्वजनिक कार्यक्रम ३१मार्च पर्यंत रद्द...