दौंड,दि.27 फेब्रुवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-स्वामी
चिंचोली (ता. दौंड) येथील पाटबंधारे विभागाच्या चारीवरून ग्रामपंचायतीतर्फे बेकायदा करण्यात येत असलेले डांबरीकरणाचे काम तातडीने थांबवावे व कामाला मंजुरी देणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वामी चिंचोली (ता.दौंड) येथील शेतकरी सिंचन भवन(पुणे) येथे मुकुंद वेताळ (रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड) हे दि.24 फेब्रुवारी पासुन उपोषणास बसले होते. करार न करताच सिंचन विभागाने करारनामा न करताच परवानगी दिली व ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाशी कोणताही करार न करता डांबरीकरणाच्या कामास बेकायदा सुरुवात केल्याचे वेताळ यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी दोषी पाटबंधारे विभाग व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी,कारण त्यांनी सिंचन विभागाची व शासनाची फसवणुक केली आहे,त्यामुळे दोषीवर कारवाही झाली पाहीजे अशी मागणी वेताळ यांनी केली आहे.पञकार अधिकारी व वेताळ यांच्याशी बोलुन चर्चा घडवुन आणली व त्यामुळे तब्बल चार दिवसानी अधिकारी व वेताळ यांच्यात चर्चा झाली,व न्यायालीन बाबी चालु असल्याने त्या पुर्ण झाल्यास व शासनाच्या चौकशी निर्णयानी दोषी वर कारवाही केली जाईल असे लेखी अश्वासन दिल्या नंतर वेताळ यांनी उपोषण मागे घेतले,कार्यकारी अभियंता पाटील व अधिक्षक चोपडे हे बाहेर असल्याने त्यांच्याशी संपर्क साधुन डिव्हीजनल पि ए राजकुमार उबाळे,व सर्कल पी ए कुलकर्णी,यांनी अश्वासन पञ दिले तर कुलकर्णी यांनी लिंबु सरबत देत वेताळ यांचे उपोषण मागे घेतले.माञ मुख्य अभियंता मोहीते यांनी पञकार पोलीस यांना भेटले नाही व भेटण्यास टाळाटाळ केली,तर त्यांचे नाईक आत चिट्टी सुद्धा देत नव्हते,त्या मुळे मुख्य अभियंता जनतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाहीत हे निर्देशनास आले.पुढील बाब न्यायालयीन बाजु असल्याने न्यायालयीन मार्गाने लढा देऊन हा प्रश्न सोडवणार,व त्या मधी जर समोरच्यानी न्यायालयाचा अवमान करत बेकायदेशीर काम केल्यास आत्मदहन करण्याची देखील तयारी आहे असे पञकारांशी बोलताना सांगितले.या उपोषणा दरम्यान पो.ना.राजु शेख व शिंदे यांनी वेळोवेळी वेताळ यांना मेडीकल ला घेऊन जात होते.
Home ताज्या बातम्या स्वामी चिंचोली येथील मुकुंद वेताळ यांचे उपोषण तब्बल चार दिवसानी अधिकार्याच्या लेखी...