देहुरोड,दि.22फेब्रुवारी2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954 रोजी देहुरोड या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांची मुर्ती बसवली त्यामुळे या बुद्ध विहाराला ऐतिहासिक असं महत्त्व प्राप्त झाला आहे,फक्त भव्य बुद्ध विहाराच्या निर्माणासाठी (रजि.न.A/1197/पुणे)बुद्धविहार ट्रस्ट म्हणजे तेव्हाची बुद्धविहार विहार समितीने 20,000 चौरस फूट डिफेन्स लँडची मागणी केली होती व त्यास संरक्षण खात्याने देण्यास मंजुरी दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील बुद्ध विहार कृती समिती(रजि.नं. E/1546/पुणे)यांनी कृती या शब्दाचा वापर करत संरक्षण मंत्रालय व त्यांच्या नावावर असलेले 20,000 चौरस फूट जागा बुद्धविहार कृती समितीने खरेदी केली अशाप्रकारे बुद्ध विहार कृती समितीने बौद्ध समुदायाशी विश्वासघात केल्यामुळे बौद्ध जनते मध्ये एक असंतोष निर्माण झाला असून एक चीड निर्माण झाली आहे बुद्ध विहार कृती समितीचे अध्यक्ष सिताराम उर्फ टेक्सास गायकवाड हे एक उत्तम नाटककार कलाकार असून त्यांना त्या जागेवर स्वतःसाठी व कुटुंबाच्यासाठी पैसे कमवण्याच्या हेतुने बुद्धविहार वगळता कलाकारांसाठी या ठिकाणी ऑडोटोरियम बांधायचे आहे व्यवसायीक दृष्टीकोनातून उभारायचे आहे,हि बाब बोधीसत्व जन जागृती संघ(रजि.न.MH/1772/2019/पुणे) यांच्या लक्षात आल्याने बोधिसत्व जनजागृती संघाने बुद्ध विहार कृती समितीला संरक्षण मंत्रालयातून विशेष बांधकामास परवानगी देऊ नये व सेलडिड रद्द करावे अशी मागणी डिफेन्स इस्टेट ऑफिसर सदन कमांड पुणे व ब्रिगेडियर अध्यक्ष कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड यांच्याशी चर्चा करून यांना निवेदन अर्ज दिले आहे व त्याची प्रत सीईओ कँटोन्मेंट बोर्ड देहूरोड, उपाध्यक्ष सी बी डी आर,खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार सुनिल आण्णा शेळके व पोलीस निरीक्षक देहूरोड पोलीस स्टेशन यांना प्रत पाठवली आहे बुद्ध विहार कृती समितीला विशिष्ट बांधकामाची परवानगी दिल्यास देहूरोड येथील कायदा-सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होईल व बौद्ध लोक रस्त्यावर उतरतील यास संरक्षण विभाग व कँटोन्मेंट बोर्ड जबाबदार असेल याची दखल घ्यावी महाराष्ट्र शासनाने बुद्ध विहारावर प्रशासक नेमावा व महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत बुद्धविहाराचा विकास व्हावा अशी मागणी बोधिसत्व जनजागृती संघ यांनी केली आहे अशी माहिती बोधिसत्व जनजागृती संघाचे अध्यक्ष संगीता ताई अशोक वाघमारे सचिव विजय पवार यांनी प्रजेचा विकासला प्रेस नोट च्या माध्यमातुन दिली.