Home ताज्या बातम्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल ‘बघून तुला’ डॉ. उत्कर्ष शिंदे व प्रीती तेजस यांचे...

व्हॅलेंटाईन डे स्पेशल ‘बघून तुला’ डॉ. उत्कर्ष शिंदे व प्रीती तेजस यांचे प्रेमगीताने सोशल मिडियावर घालणार धुमाकूळ

0

उत्कर्षच्या अवाजामुळे हे गान अधिक भारदस्त झाले आहे,-प्रीती तेजस

व्हॅलेंटाईन डे हे प्रेमाचा प्रतिक म्हणुन साजरा करावा प्रेम हे निसर्गावर,आई बाबा मिञ प्राणी ह्या सर्वावर प्रेम करावे कारण प्रेम हा जिव्हाळाचा भाग आहे,प्रेम म्हणजे लफड या पेक्षा काही वेगळे आहे हे दाखवण्याचा प्रयन्त हा आहे- डाॅ.उत्कर्ष शिंदे
पिपरी,दि.11 फेब्रुवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- युवक युवतींच्या पहिल्या नजरेतील प्रेम भावना व्यक्त करणार्‍या ‘बघून तुला’ या प्रेम गीताच्या टिजरने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. शिंदेशाही घराण्यातील तीस-या पिढीचे प्रतिनिधी युवा गायक डॉ. उत्कर्ष शिंदे आणि पिंपरी चिंचवड मधील युवा गायिका प्रीती तेजस यांनी गायलेले ‘बघुन तुला’ हे गाण आज मंगळवारी व्हॅलेंटाईन डे च औचित्य साधून रेझोनन्स स्टुडिओच्या युट्युब चॅनेल वर प्रेक्षकांना पाहण्यासाठी सादर करण्यात आले.
पिंपरीत मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात युवा गायक डॉ. उत्कर्ष शिंदे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, तरुणाई म्हटलं की प्रेम आलंच आणि त्यातही बऱ्याच जणांना पहिल्या नजरेत प्रेम होत असतं. याच संकल्पने वर आधारीत प्रीती तेजस यांनी निर्मिती केलेले हे गीत आणि तेजस चव्हाण यांनी संगीत रचना केलेली ही कलाकृती सर्व तरुणाईला वेड लावेल. या गाण्याचे चित्रीकरण निसर्गरम्य मावळ परिसरात करण्यात आले आहे. गाण्याचे पोस्ट प्रोडक्शन शहरातील एकमेव अत्याधुनिक फिल्म प्रोडक्शनचा सेटअप असणा-या रेझोनन्स स्टुडिओत करण्यात आले आहे.
डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी लिहिलेल्या व संगीतबध्द केलेल्या ‘धुराळा’ या चित्रपटातील ‘नाद करा पण आमचा कुठं’ या गाण्याला आणि प्रियतमा’ या चित्रपटातील गायलेल्या गीतांना अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले हे.संगीतकार तेजस चव्हाण यांच्या, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अभिवाचन केलेल्या व गायिका बेला शेंडे यांनी गायलेल्या मराठीतील पहिल्या ब्रेथलेस गाण्याची लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. तसेच हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील शंकर महादेवन, सुरेश वाडकर, कैलास खेर, स्वप्निल बांदोडकर, आदर्श शिंदे, रोहित राऊत,आनंदी जोशी अशा अनेक नामवंत कलाकारांनी तेजस चव्हाण यांच्या रचना गायलेल्या आहेत. रेझोनन्स स्टुडिओचे संचालक तेजस चव्हाण व बी.महांतेश्वर हे संगीत व चित्रपट क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग करीत असतात. त्यांनी अनेक नवीन कलाकारांना संधी दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरात फिल्म प्रोडक्शनसाठी आवश्यक असणा-या आधुनिक सुसज्ज रेझोनन्स स्टुडिओचा अनेक नामवंत कलाकारांनी लाभ घेतला आहे अशी माहिती तेजस चव्हाण यांनी दिली.या गाण्याची निर्मिती प्रीती तेजस व रेझोनन्स स्टुडिओ, संगीत रचना तेजस चव्हाण, गीतकार योगेश काळे, गायक डॉ. उत्कर्ष शिंदे आणि प्रीती तेजस, दिग्दर्शन आणि संकलन बी. महांतेश्वर, प्रमुख भमिका राहुल बो-हाडे आणि श्रद्धा पाटील तसेच डॉ. निर्मल ढुमणे, अस्मय पाटील, उज्वला पाटील आदी. छायांकन निमेश हिरवे, ध्वनिमिश्रण अजिंक्य ढापरे यांनी केले आहे. तसेच दत्ता शेवाळे, संदेश सातकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.’बघुन तुला’ हे चार मिनिटांचे गीत प्रेक्षकांना रेझोनन्स स्टुडिओच्या युट्युब चॅनेल वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.आपण ते पहाव असे तेजस चव्हाण यांनी सर्वाना अहवान केले आहे.

Previous articleहिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर संपली
Next articleरमाई जयंतीनिमित्त राज्यात पहिल्यांदा उच्चशिक्षीत महिलांचे अभिवादन रमाईच्या स्मरणार्थ मुस्लीम मुलींना अधिकारी करणार- दिपक कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 5 =