नांदेड,दि.11 फेब्रुवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-आंबडकरवादी मिशनमध्ये माता रमाई यांच्या १२२ व्या जयंती निमित्त बुद्धिजिवी, उच्चशिक्षीत आंबेडकरवादी महिलांचा अभिवादन मेळावायो आयोजित करण्यात आला होता. राज्यात पहिल्यांदाच उच्चशिक्षीत महिलांनी एकत्रीत येऊन रमाईला जयंतीनिमित्त अभिवादन केले. १००पेक्षा अधिक अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापिका, उद्योजक महिलांनी यात सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी येथे कार्यरत असलेल्या अप्पर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणूनशि शिक्षणाधिकारी तथा नवनियुक्त उपसंचालक शिक्षण वंदना वाहळे तर प्रमुख उपस्थितीत डॉ. वंदना संग्राम जोंधळे, डॉ. त्रिशला अशोकधबाले, डॉ.स्मिता पाईकराव (महिला आरोग्य तज्ञ), डॉ. कांचन कैलास ढवळे, इंजि. सविता पडघने, संघमित्रा सोनकांबळे, सोप्नाली धुतराज (पोलिस निरिक्षक), डॉ. प्रा.कविता सोनकांबळे, डॉ.प्राचार्य संघमित्रा गोणारकर, डॉ. विशाखा मस्के, डॉ. प्रा. रेखा वाडेकर, डॉ.स्नेहा तारू, डॉ.प्रा. अमृपाली कसबे, डॉ. प्रा. सुनिता माळी, प्रियंका कुन्हाडे (महिला व बालविकास अधिकारी), डॉ. स्नेहा सिंगनकर, डॉ.पुनम गायकवाड, प्रा. माया भद्रे, डॉ. प्रज्ञा किन्हाळकर, डॉ. टेंभुर्णीकर मॅडम, डॉ. रामटेके मॅडम, डॉ. छाया सप्रे, संबोधी कानिंदे, डॉ. स्नेहल थोरात, करूणाताई तारू, माया सोनकांबळे, करूणा जाधव, विद्या पोवळे, नंदा वाघमारे, मयुरी नाईक, आशा चिकटे (उद्योजक लातूर),मालतीताई वाघमारे, प्रा. माया कांबळे इ. मान्यवर उच्चशिक्षीत आंबेडकरवादी महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती.मुलींनी लग्नापेक्षा शिक्षण व स्वत:च्या पायावर उभे टाकण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन ज्योती बगाटे यांनी केले. उच्चशिक्षण हाच स्त्रीमु क्तीचा एकमेव उपाय असल्याचे शिक्षणाधिकारी वंदना बगाटे यांनी स्पष्ट केले. विकारमुक्त जिवन जगण्यासाठी व आयुष्यात यशस्वीहोण्यासाठी विपश्यना करावी असे डॉ. वंदना जोंधळे यांनी स्पष्ट केले. आंबेडकरवादी मिशन हे मुलींना उच्च पदावर पोहोचवणे व त्यांच्यासाठी सर्व संकटात सहकार्य करण्यासाठीचे एकमेव विचारमंच असल्याचा या प्रसंगी इंजि. सविता पडघने यांनी मत व्यक्त केले. रमाईच्या त्यागाला उच्चशिक्षीत होवून अभिवादन करा असे मुलींना आवाहन स्वप्नाली धुतराज (पोलिस निरिक्षक) यांनी केले. आंबेडकरवादी मिशनने राज्यातप हिल्यांदाच पुढाकर घेवून उच्च शिक्षित महिलांना एका विचारमंचावर आणल्याबद्दल केंद्राचे आभार डॉ. त्रीशला धबाले यांनी मानले.या प्रसंगी आंबेडकरवादी मिशनला जागा देवून ऐतिहासिक योगदान दिल्याबद्दल करूनणाताई तारू यांचा भव्य सत्कार करण्यात आला.मातृत्वास अभिवादन म्हणून समाजासाठी आपल्या एकूलत्या एक मुलाला समाजसेवेसाठी आर्पण करणाऱ्या सावित्रीमाई संभाजी कदम यांचा याप्रसंगी भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कामगारांच्या हाताला सन्मान म्हणून मिशनकेंद्रात कार्यरत सर्व महिलांचा विशेषत: सत्कारक रण्यात आला. उपस्थित सर्वच महिलांचे मुकनायक व बुद्ध आणि त्यांचा धम्म हे ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला.विदिशा व ऐश्वर्या चिकटे यांनी या प्रसंगी आपण ऑक्सफर्ड व लंडनस्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये उच्च शिक्षण घेणार असल्याचे घोषित केले.यावर्षी जिल्हास्तरीय होणाऱ्या या उच्चशिक्षीत बुद्धिजिवी आंबेडकरवादी भगीनींच्या अभिवादन सोहळ्याचे रूपांतर पुढीलवर्षी राज्य व राष्ट्रीय स्वरूप देवू असे या प्रसंगी दीपक कदम (प्रमुख, आंबेडकरवादी मिशन) यांनी घोषित केले. मुस्लीम मुली शिक्षण व अधिकारी क्षेत्रात पुढे याव्यात म्हणून माता रमाई यांच्या स्मरणार्थ विशेष गुणवत्ता प्राप्त पदवीधर मुस्लीम मुलींना आंबेडकरवादी मिशन निशुल्क प्रवेश देऊन आधिकारी आयपीएस करण्यात येईल अशी घोषणा यावेळी दीपक कदम यांनी केली. याचा लाभ मुस्लीम उच्चशिक्षीत मुलींनी घ्यावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. आंबेडकरवादी महिला संघाच्या वतीने हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघमित्रा वाघमारे,कांचन कदम, दयावंता देवकांबळे, दिपाली पहरकर, प्राची मादळे, जिविका वाघमारे, पल्लवी इंगळे, यशश्री गांगुर्डे, प्रगती आंबेकर, मिनाचा पोलिकर, दिक्षा गायकवाड आदी.नी परिश्रम घेतले.
Home ताज्या बातम्या रमाई जयंतीनिमित्त राज्यात पहिल्यांदा उच्चशिक्षीत महिलांचे अभिवादन रमाईच्या स्मरणार्थ मुस्लीम मुलींना अधिकारी...