Home ताज्या बातम्या सरकारने द्यावा मूकनायक पुरस्कार-माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले

सरकारने द्यावा मूकनायक पुरस्कार-माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले

0

नागपूर,दि.30 जानेवारी 2020 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या’मूकनायक’ या पाक्षिकाला शंभर वर्ष पूर्ण झाली असून ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाची स्थापना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. ‘मूकनायक’ चे हे
शताब्दी वर्ष असुन महाराष्ट्र शासनाने मूकनायक पुरस्कार समारोह घ्यावा अशी सुचना महाराष्ट्र राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री श्री राजकुमार बडोले यांनी राज्य शासनाला केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळची सामाजिक स्थिती बघता ३१ जानेवारी १९२० मध्ये ‘मकनायक’ हे पाक्षिक सुरू केले. अनंत अडचणींवर मात करून समाजातल्या अत्यंत विपन्नावस्थेत असलेल्या तसेच भिषण आर्थिक,सामाजिक स्थिती दयनिय असलेल्यास समाजाला जागृत करण्यासाठी या पाक्षिकाची स्थापना करण्यात आली होती. त्याला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या आणि कालच्या पत्रकारितेत अनेक बदल घडुन आले आहेत. मात्र बाबासाहेबांची पत्रकारिता जे खरोखरच विपदेत आहेत त्यांना न्याय देण्यासाठी होती. ‘मूकनायक’बहुजन समाजासाठी एक प्रेरणा आहे.
समाजातल्या ग्रामीण भागात जाऊन पत्रकारिता करणाऱ्यांसाठी तसेच बहुजन समाजातील पत्रकारांच्या कार्याची दखल घेण्यासाठी ३१ जानेवारी २०१९ रोजी दिल्ली येथे ‘मूकनायक पुरस्कार’ सुरू करण्यात आला होता. मात्र यावर्षी राज्यात सत्ताबदल झाला. या वर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे किंवा नाही याबद्दल कळण्यास काहीच मार्ग शिल्लक राहिला नाही. नवीन सरकार, नवीन मंत्री असल्याने त्यांना मूकनायक पुरस्काराची माहिती नाही. त्यामुळे या नव्या सरकारला स्मरण
करण्यासाठी माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी ‘मूकनायक पुरस्कार’समारोह राज्य शासनाने घ्यावा असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र शासनाला केले
आहे.

Previous articleरावण टोळीतील सदस्य सागर परिट याला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह देहुरोड पोलीसांनी केले जेरबंद
Next articleमहिलांचे सक्षमीकरण झाले तरच देश महासत्ता होईल-देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 − five =