निगडी,दि.24 जानेवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-निगडी):-
मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने माजी गृहराज्यमंत्री व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश दादा बागवे यांच्या वाढदिवसा निमित्ताने निगडीतील भुइटे अपंग विद्यालयात फळे वाटप करण्यात आले तसेच सावित्रीच्या लेकींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली धोंडीराम भुइटे यांना तर भूमिका राजेंद्र इंगळे, शर्मिन यासिक शेख, योगिता मारुती घाडगे , साक्षी देविदास साळुंखे , या अपंग विद्यार्थिनींना सावित्रीच्या लेकी या सन्मानाने पुरस्कृत केले.दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात संघटनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक तरूणांना सक्षम बनवण्यासाठी काम केले जाते.या कार्यक्रमास संघटनेचे राज्य समन्वयक विठ्ठल थोरात, जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे,देहुरोड टाईम्सचे संपादक- संजयजी धुतडमल, मारूंजी गावचे उपसरपंच संदिप जाधव , शेषेराव कसबे, संघटनेचे शहराध्यक्ष दत्तु चव्हाण, युवक अध्यक्ष विशाल कसबे, महिला अध्यक्ष आशा शहाणे, बाळासाहेब पाटोळे, लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश सचिव धुराजी शिंदे धुराजी शिंदे, मिना कांबळे, राजू धुरंधरे, साहेबराव थोरात,दशरथ सकट, विठ्ठल कळसे, सचिन दुबळे, दिपक लोखंडे, कैलास पाटोळे, शंकर वैरागे, दत्ता थोरात, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन दत्तु चव्हाण, विशाल कसबे, आशा शहाणे यांनी केले.व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कसबे यांनी केले तर प्रास्ताविक दत्तु चव्हाण यांनी केले व आभार दशरथ सकट यांनी मानले.
Home ताज्या बातम्या मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने निगडीतील अपंग विद्यालयात फळे वाटप व सावित्रीच्या...