देहुरोड,दि.24 जानेवारी 2020(प्रजेचा विकासू न्युज प्रतिनिधी):-
वंचित चा महाराष्ट्र बंदच्या हाकेला देहूरोड शहरातून प्रतिसाद आज देहूरोड मध्येही बंद पाळण्यात आला तुरळक ठिकाणी काही दुकाने चालु होते ते वगळता संपूर्ण देहूरोड शहरांमध्ये वंचित चा ह्या बंदला व्यापारी वर्ग कार्यकर्ते दुकानदार व इतर सामाजिक धार्मिक संघटनेचा पाठिंबा होता यावेळी वंचित बहुजन आघाडीचे देहूरोड शहराचे अध्यक्ष विजय आल्हाट, सुरेश भालेराव, अविनाश गायकवाड ऐतिहासिक धम्मभुमी बुद्धविहाराचे ट्रस्टी सुमेध भोसले चंद्रकांत भालेराव व आधी कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी 24 जानेवारी 20 20 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्यामुळे महाराष्ट्र मध्ये सर्व ठिकाणी बंद पाळण्यात आला तसेच देहूरोड शहरातही बंद पाळण्यात आला व प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन चार वाजता बंद मागे घेतल्यानंतर देहूरोड परिसरातही बंद मागे घेण्यात आला व सर्व बाजारपेठ व दुकानदार रस्ते सुरळीत नियमित चालू झाले.वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला आहे. चार वाजल्यानंतर जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी बंद मागे घेत आहोत असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. आम्ही बंदसाठी जबरदस्ती केली नाही तसेच हिंसाचारही केलेला नाही असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. सीएए आणि एनआरसीच्या विरोधासाठी प्रकाश आंबेडकर यांनी हा बंद पुकारला होता.