देहुरोड,22डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-बुद्ध विहार ट्रस्ट देहूरोड(अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर) आणि धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्था अंतर्गत महिला आघाडी या संघटनांनी ऐतिहासिक धम्मभुमी देहुरोड बुद्ध विहारात वंदने साठी घ्यावी लागणार परवाणगीचा फलक पाहुन बौद्ध बांधवाच्या भडकलेल्या भावनाचा विचार करुन धम्मभूमी सुरक्षा समिती नोंदणीकृत नसलेली व बुद्धविहाराचे संबंधित नसलेली बुद्ध विहार कृती समिती या दोन्ही संस्था बेकायदेशीरपणे ऐतिहासिक धम्मभूमी येथे लावलेले नाम फलक काढून टाकण्यात यावे व तसेच तेथील वातावरण चिडेल याबाबतचे व वर्तन करतात. बुद्ध विहार कृती समिती व नोंदणीकृत नसलेली धम्मभूमी सुरक्षा समिती यांनी बुद्धविहाराचे प्रांगणात एक फलक लावला आहे त्यामध्ये हा मजकूर असा होता ऐतिहासिक धम्मभूमी वरील बुद्ध विहार हे सर्व जाती-धर्माच्या नागरिकांसाठी अभिवादनासाठी खुले आहे नियोजित कार्यक्रमाची गैरसोय टाळण्यासाठी बुद्ध विहार कृती समिती व जन्मभूमी सुरक्षा समितीच्या पूर्वपरवानगीने इथे वंदना अथवा कार्यक्रम करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कृपया धम्मशील बांधवांनी सहकार्य करावे आपले विनीत बुद्धविहार कृती समिती व धम्मभूमी सुरक्षा समिती सदर धम्मभूमीच्या आवारातील ह्या फलकावरून अनेक चर्चांना उधाण आले होते, 25 डिसेंबर बुद्धविहार वर्धापन दिन जवळ आल्यास असे अनेक प्रकार देहू रोड करांना व इतर संबंधित सर्वांना ते पहावयास मिळते बुद्ध विहार ट्रस्ट व तसेच धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था अंतर्गत महिला आघाडी असं काही सर्व महिला मिळून ह्या दोन्ही संस्थेने बुद्ध विहार कृती समिती व धम्मभूमी सुरक्षा समिती यांच्याविरोधात देहूरोड पोलीस स्टेशन कडे धाव घेतली होती व संबंधित संघटनेवर कारवाई करण्यात यावी असे पत्र पत्र दिले होते,समाजाच्या भावनाची दखल घेत प्रजेचा विकास नी बातमी प्रकाशीत केली व देहुरोड पोलिस स्टेशनचे वरीष्ट पोलिस निरिक्षक मनीष कल्याणकर साहेब यांनीही दखल घेतली त्यांच्या सांगण्यावरुन धम्मभूमीवर मिटींग घेऊन बुद्धविहार कृती समीती कडुन वंदनेच्या परवानगीचा फलक काढण्यात आला कारण या वास्तूस डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते स्थापन झालेली ही बुद्धमूर्ती व विहार हे 1956 दीक्षा घेण्यापूर्वीच असल्याकारणाने या भूमीला एक ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले असल्याकारणाने येथे कोणासही वंदना व दर्शनास मज्जाव नाही त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ नये, यासाठी काळजीपुर्वक कल्याणकर साहेबांनी दखल घेतली,महिलांनी वंदना घेतली व सदर प्रजेचा विकास व पोलीस निरिक्षक मनीष कल्याणकर साहेबांचे आभार मानले,व धम्मभुमीच्या परीसरात आंनदमय वातावरण निर्माण झाले.
Home ताज्या बातम्या धम्मभुमी देहुरोड बुद्ध विहारात वंदनेसाठी परवानगीचा फलक काही संघटनेच्या विरोधामुळे व बातमी...