पिंपरी,दि.२० डिसेंबर २०१९(प्रजेचा विकास आॅनलाईन न्युज प्रतिनिधी-संतोष शिंदे):-
संसदेत नुकतेच नव्याने झालेला CAA कायदा व प्रस्तावित NRC कायदा रद्द करणेबाबत सर्व ठिकाणीअंदोलन चालु आहेत तसेच आज पिंपरी चिंचवड शहारात कुल जमाअती तंजीम व संविधान प्रेमी संघटनांच्या आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी चौक येथे मोठ्या प्रमाणात अंदोलन केले.भारताच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ म्हणजेच संसेदच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाचा प्रचंड विरोध असताना सुद्धा भारतीय लोकशाहीला काळिमा फासणारी व असंविधानिक घटना नुकतीच लोकसभा आणि राज्यसभेत बहुमताच्या जोरावर प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री असलेले मा.अमित शहा यांनी घडवून आणलेली आहे. हि घटना व कायदा म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेलाच पायदळी तुडविणारी आहे.भारतीय लोकशाहीचा डोलारा हा ज्या मूलतत्वांवर आधारलेला आहे. तो म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या मूळ तत्वालाच सुरुंग लावणारा कायदा म्हणजे नवीन नागरिकता संशोधन कायदा होय. भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य तत्वानुसार व्यक्तीला केंद्र बिंदू मानून राज्य कारभार करणारा देश आहे. देशातील एका विशिष्ट वर्गाला म्हणजे मुस्लिम समाजाला त्रास देण्याच्या उद्देशाने हा कायदा तयार केलेला आहे. जणू काही मुस्लिम या देशाचे रहिवाशी नाहीत. हा फक्त हिंदूंचा देश आहे. अश्या प्रकारचे धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान भारताचे गृहमंत्री मा. अमित शहा यांनी लोकशाहीच मंदिर असलेल्या सर्वोच सभागृहात केले. आणि या विषयावर बोलत असताना ते म्हणाले कि यानंतर आम्ही संपूर्ण देशात NRC लागू करणार आहोत त्यांच्या या वक्त्यव्यामुळे संपूर्ण भारतातील मुस्लिम व इतर बहुजन समाज भयभीत झाला आहे.
कारण मागील काही दिवसापूर्वी आसाम राज्यामध्ये प्रचंड विरोध असताना सुद्धा NRC कायदा लागू केला त्यामध्ये जवळपास १९ लाख लोकांची नावे काही तांत्रिक अडचणीमुळे नोंदवली गेली नाहीत. त्यामध्ये जवळपास १४ लाख हिंदू व इतर धार्मिक समाजातील लोक आहेत. आणि जवळपास ५ लाख मुस्लिम समुदायाचे लोक आहेत. भारतातील सर्व नागरिकांकडे व विशेष करून मुस्लिम समुद्याकडे ७० वर्षाचे महसुली पुरावे मागितले जात आहेत. ते सध्या त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत. म्हणून त्या सर्व सहभागी असलेल्या तमाम भारतीयांना निर्वासित छावण्यांमध्ये मरण यातना सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे भारतातिल फक्त मुस्लिम समाजातच नव्हे तर भारतीय संविधानाला मानणाऱ्या सर्व समाजातील लोकांमध्ये हि नाराजी आंदोलनाच्या रूपाने प्रकट होताना दिसून येत आहे. सर्वसामान्य जनतेची नाराजी व असंतोष हि भविष्यात कधी उग्र स्वरूप धारण करू शकते. त्याचाच एक भाग म्हणून आज पिंपरी चिंचवड शहारात कुल जमाअती तंजीम व संविधान प्रेमी संघटनांच्या आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी चौक येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन घेण्यात आले. या मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जाती धर्मातील लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होते. तसेच यावेळेस लोकांनी मोठ्या प्रमाणात केंद्रशासनाच्या व नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या विरोधात हा कायदा रद्द होण्यासाठी घोषणा दिल्या
तसेच यावेळी प्रमुख पदाधिकारी मौलाना अ अलीम अन्सारी,मौलाना अब्दुल गफ्फार,मौलाना नय्यर नुरी,मौलाना फैज अहमद फैजी,मुफ्ती आबिद रजा,कारी इकबाल साहब,मौलाना उमर गाझी,मौलाना तन्वीर रिजवी,मौलाना मुब्बशीर,मौलाना मुक्तदिर कादरी , जनाब अकील मुजावर, हाजी गुलजार, युसूफ कुरेशी, हाजी गुलाम रसूल, आजच्या या आंदोलनात कुल जमाअती तंजीम, रयत विद्यार्थी विचार मंच, नागरी नागरी हक्क सुरक्षा समिती, कष्टकरी कामगार पंचायत ,बहुजन हिताय बहुजन सुखाय वाचनालय, भीमशक्ती युवा संघटना,इत्यादी संविधानप्रेमी संघटनांनी भाग घेतला.तसेच शहरातील विविध सामाजिक राजकीय संघटनांचे/पक्षाचे मानव कांबळे सर्वजीत बनसोडे,देवेंद्र तायडे, सचिन साठे,राहुल कलाटे ,मारुती भापकर,बाबा कांबळे,धम्मराज साळवे संतोष शिंदे,अंजना गायकवाड सुरेश रोकडे, इत्यादी उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड शहारात कुल जमाअती तंजीम संघटनांच्या वतीने CAA कायदा व प्रस्तावित...