देहुरोड,20 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
बुद्ध विहार ट्रस्ट देहूरोड(अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर) आणि धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्था अंतर्गत महिला आघाडी या संघटनांनी ऐतिहासिक धम्मभुमी देहुरोड बुद्ध विहारात वंदने साठी घ्यावी लागणार परवाणगीचा फलक पाहुन बौद्ध बांधवाच्या भडकलेल्या भावनाचा विचार करुन धम्मभूमी सुरक्षा समिती नोंदणीकृत नसलेली व बुद्धविहाराचे संबंधित नसलेली बुद्ध विहार कृती समिती या दोन्ही संस्था बेकायदेशीरपणे ऐतिहासिक धम्मभूमी येथे लावलेले नाम फलक काढून टाकण्यात यावे व तसेच तेथील वातावरण चिडेल याबाबतचे व वर्तन करतात. बुद्ध विहार कृती समिती व नोंदणीकृत नसलेली धम्मभूमी सुरक्षा समिती यांनी बुद्धविहाराचे प्रांगणात एक फलक लावला आहे त्यामध्ये हा मजकूर असा आहे ऐतिहासिक धम्मभूमी वरील बुद्ध विहार हे सर्व जाती-धर्माच्या नागरिकांसाठी अभिवादनासाठी खुले आहे नियोजित कार्यक्रमाची गैरसोय टाळण्यासाठी बुद्ध विहार कृती समिती व जन्मभूमी सुरक्षा समितीच्या पूर्वपरवानगीने इथे वंदना अथवा कार्यक्रम करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कृपया धम्मशील बांधवांनी सहकार्य करावे आपले विनीत बुद्धविहार कृती समिती व धम्मभूमी सुरक्षा समिती सदर धम्मभूमीच्या आवारातील ह्या फलकावरून अनेक चर्चांना उधाण आले आहे, 25 डिसेंबर बुद्धविहार वर्धापन दिन जवळ आल्यास असे अनेक प्रकार देहू रोड करांना व इतर संबंधित सर्वांना ते पहावयास मिळते बुद्ध विहार ट्रस्ट व तसेच धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था अंतर्गत महिला आघाडी असं काही सर्व महिला मिळून ह्या दोन्ही संस्थेने बुद्ध विहार कृती समिती व धम्मभूमी सुरक्षा समिती यांच्याविरोधात देहूरोड पोलीस स्टेशन कडे धाव घेतली व संबंधित संघटनेवर कारवाई करण्यात यावी असे पत्र पत्र दिले धम्मभूमी ऐतिहासिक असल्याकारणाने जगभरातून बौद्ध अनुयायी व इतर समाजातील बौद्ध धम्म मानणारा वर्ग हा तेथे दर्शनासाठी येत असतो व तेथे दर्शनास आल्यावर पाच मिनिट का होईना वंदना घेतो कारण या वास्तूस डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते स्थापन झालेली ही बुद्धमूर्ती व विहार हे 1956 दीक्षा घेण्यापूर्वीच असल्याकारणाने या भूमीला एक ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले असल्याकारणाने येथे कोणासही वंदना व दर्शनास मज्जाव नसावा तसे असल्यास धार्मिक भावना व धार्मिक स्वातंत्र्यावर गदा निर्माण करण्याचा प्रश्न निर्माण होतो असंतोष निर्माण होतो व त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदान केलेल्या भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्क व स्वातंत्र्य या हक्क स्वातंत्र्याचा हक्क यावर गदा आणणारा मजकूर आहे त्यामुळे ह्या या मूलभूत हक्क व स्वातंत्र्याचा हक्क यांचे पायमल्ली करणारा असून त्यावर कारवाई करण्यात यावी व संबंधित फलक काढून त्याठिकाणी वंदनेस कोणाचाही मज्जाव नसावा सदर वास्तू ही सर्वांसाठी खुली आहे आणि कोणाच्याही मालकीची नसून हे फक्त आणि फक्त समाजाची आहे त्यामुळे समाजासाठी ही वास्तू सदैव खुली असून याठिकाणी दर्शन वंदना घेण्यास कोणालाही मज्जाव नसावा व तसे काही कृत्य केल्यास कोणतीही बेकायदेशिर संघटना व संघटना यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणणार्या व मूलभूत हक्काची पायमल्ली करणाऱ्या अशा संघटनांना सबब द्यावा आणि हे व सर्वांसाठी खुले असावी, देहूरोड पोलीस स्टेशन या ठिकाणी बुद्ध विहार ट्रस्ट यांनी 18 डिसेंबर रोजी तर धम्मभूमी मी देहूरोड सामाजिक संघटना महिला आघाडी यांनी 19 डिसेंबर रोजी देहूरोड वरिष्ठ अधिकारी पत्राच्या माध्यमातून निवेदन सादर सादर करून कारवाई करण्यात यावी अशी आशा व्यक्त केली व 25 डिसेंबर 2019 रोजी येणारा लाखो समुदायास कोणत्याही अडचण निर्माण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली बुद्ध विहार ट्रस्ट हे पुढील काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
Home ताज्या बातम्या ऐतिहासिक धम्मभुमी देहुरोड बुद्ध विहारात वंदने साठी घ्यावी लागणार परवाणगीचा फलक पाहुन...