Home ताज्या बातम्या वॉशरूममध्ये बोलावून केली चित्रफित; व्हायरल होण्याच्या भीतीने मुलीची आत्महत्या

वॉशरूममध्ये बोलावून केली चित्रफित; व्हायरल होण्याच्या भीतीने मुलीची आत्महत्या

0

वाशिम,6 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या वॉशरूममध्ये एकाने विध्यर्थिनीची चित्रफीत काढून सोशल मीडियावर प्रसारित केली. यामुळे आपली बदनामी होईल या भितीने मुलीने आत्महत्या केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली. या प्रकरणी मंगरुळपीर पोलिस ठाण्यात २ युवकांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद हायस्कुलमधील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीस प्रतीक दिनकर डोंगरे याने वॉशरूममध्ये बोलावले. यावेळी दिपक महादेवराव वानखडे नामक युवकाने दोघांची व्हिडिओ शूटिंग करून ते मोबाईलवर व्हायरल केले. या प्रकाराने धक्‍का बसलेल्‍या पीडित मुलीने समाजात आपली बदनामी होईल या भितीने आत्महत्या केली आहे.
या घटनेची फिर्याद मुलीच्या वडिलांनी मंगरुळपीर पोलिस ठाण्यात नोंदविताच पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून एकास अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपस मंगरूळपीर पोलिस करीत आहेत.

Previous articleहैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार
Next articleमला बोद्ध भिख्खू व्हायचे होते पण होता आले नाही महापरिनिर्वाण दिनी व्यक्त केली भावना…! संजय शिंदे वडार समाजाचे नेते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 4 =