Home ताज्या बातम्या सोलापूरमध्येही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त करत अजित पवार यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात...

सोलापूरमध्येही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त करत अजित पवार यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला

0

सोलापूर ,दि.23 नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. अजित पवार यांच्याविरोधात मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोष व्यक्त करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक केली म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सोलापूर मधील हुतात्मा चौकात घोषणाबाजी करत अजित पवार यांचा पुतळा जाळण्यात आला.

अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तसंच त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांचं पत्र देत पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत फूट पाडून भाजपसोबत जाण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली तसेच पवार कुटुंबीयही अस्वस्थ झाले.

अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयाचे राज्यात पडसाद पाहायला मिळत आहेत. सकाळी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्राबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनार्थ तर अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली तर सोलापूरमध्येही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त करत अजित पवार यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला. तसेच सोशल मीडियावरही शरद पवार यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या तर अजित पवार यांच्याविरोधात पोस्ट दिसून येत आहेत.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांचं सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं अजित पवारांच्या मदतीने आज अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

Previous articleअजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीकडून हकालपट्टी
Next articleअजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात, अनेक ठिकाणी निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten − 2 =