देहुरोड,दि.20 नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-देहुरोड पोलिसांची कामगीरी रावेत जाधववस्ती येथे राहणारा कूख्यात गॅगस्टार रावण गॅंगचा मोहरक्या चिम्या उर्फ निजाप्पा गायकवाड यांस 19 नोव्हेंबर रोजी चिंचोली येथुन अटक करण्यात आली,गेल्या पाच वर्षापासुन विनोद निजप्पा गायकवाडु याच्या रावण टोळीने काळेवाडी,निगडी,आकुर्डी,रावेत,वाकड इत्यादी परिसरामध्ये दहशत बसवली होती, मोक्का अंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये विनोद निजप्पा गायकवाड व त्याच्या साथीदार यांची कारागृहात रवानगी झाल्यानंतर विनोद चा भाऊ चिम्या उर्फ अमोल निजप्पा गायकवाड याने मोक्का मध्ये वांटेड राहून भूमिगत होत ससा उर्फ वाघमोडे,सोन्या जाधव, नझीम व इतर साथीदारांचा साहय्याने प्रयत्न करत टोळी उभारण्याचा काम करीत होता त्याची माहिती देहुरोड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक प्रितम वाघ (बक्कल नंबर 664) पोलीस हवालदार श्याम शिंदे (116)पोलीस नाईक राजेश कुरणे यांची टीम करून माहिती जमा करण्याचे काम चालू असताना गुप्त बातमी दाराच्या माहितीवरून चिंचोली गावा जवळ देहूरोड येथे चिम्या उर्फ अमोल निजप्पा गायकवाड याला ताब्यात घेतले व झडती मध्ये त्याच्याजवळ एक जुने वापरत असलेली गावठी पिस्तूल मिळून आली त्यास ताब्यात घेत पोलीस ठाणे देहूरोड येथे पोलीस नाईक प्रितम वाघ यांच्या फिर्यादीवरून सदर आरोपी चिम्या उर्फ अमोल निजप्पा गायकवाड हा 2017 पासून मोक्या मध्ये वॉन्टेड होता सदर कामगिरी, संदीप बिष्णोई पोलीस आयुक्त, प्रकाश मुत्याळ पोलीस साह.आयुक्त, रामनाथ पोकळे अति.पोलीस आयुक्त, विनायक ढाकणे पोलीस आयुक्त परिमंडळ 2, संजय नाईक पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त देहुरोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर,श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक गंजेवार ,पोलीस उपनिरीक्षक जगताप,पोलीस उपनिरीक्षक गायकवाड,पोलीस हवालदार शाम शिंदे,पोलीस नाईक प्रितम वाघ पोलीस नाईक,राजेश कुरणे, पोलीस शिपाई परदेशी ,पोलीस शिपाई विक्की खोमणे यांनी ही कारवाई केली
Home ताज्या बातम्या कूख्यात गॅगस्टार रावण गॅंगचा मोहरक्या चिम्या उर्फ निजाप्पा गायकवाड यांस पिस्तुलसह अटक