Home ताज्या बातम्या आमदार अण्णा बनसोडे यांनी आकुर्डीतील नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली

आमदार अण्णा बनसोडे यांनी आकुर्डीतील नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली

0

पिंपरी,दि.9 नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-आकुर्डी गावठाण, आकुर्डी ओटास्किम परिसरातील नागरिकांना पाणी, ड्रेनेज लाईन, वीज पुरवठा तसेच भुरट्या चो-या अशा अनेक समस्या आहेत. या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष तेथे जाऊन आमदार अण्णा बनसोडे यांनी महानगरपालिकेतील संबंधित अधिका-यांसमवेत गुरुवारी (दि. 7 नोव्हेंबर) पाहणी दौरा केला.
यावेळी नगरसेवक जावेद शेख, माजी नगरसेवक संदीप चिंचवडे, ‘अ’ प्रभागाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा दुर्गुडे, उपअभियंता सुभाष काळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी शिंदे, उपअभियंता कुंभार, सामाजिक कार्यकर्ते प्रविण पवार, रमेश बोरकर, अण्णा कु-हाडे, ईकलास सय्यद, जावेद पठाण, सुनिल मोरे आदींसह स्थानिक महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
प्रभाग क्र. 14 मधील अनेक भागात अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. महावितरणचा वीज पुरवठा देखील अनेकदा खंडीत होतो. त्यामुळे सायंकाळ नंतर महिला भगिनींना असुरक्षित वाटते. आतापर्यंत अनेक ठिकाणी वाहने फोडणे व जाळण्याचे प्रकार घडले आहेत. कायदा व सुव्यवस्था अस्थित्वात नसल्यासारखे वाटते. अशा अनेक तक्रारी महिलांनी आमदार बनसोडे यांना सांगितल्या. याबाबत आ. बनसोडे यांनी उपस्थित अधिका-यांना ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले.
यावेळी आ. बनसोडे यांनी श्रीकृष्ण नगर, विवेक नगर, तुळजाई वस्ती, साई पूजा बाग, गंगा अपार्टमेंट, मोरया पद्‌मांकुर, जगदिश अपार्टमेंट, शुभश्री हौसिंग सोसायटी, सीता रेसिडेन्सी, शिवदत्त रेसिडेन्सी, भक्ती देसाई हाईट्‌स, सोनिगरा क्लासिक, लोटस प्लस, सरगम अपार्टमेंट, विजय अपार्टमेंट, शिवदत्त अपार्टमेंट, मयुर अपार्टमेंट, ओशो अपार्टमेंट, दुर्वांकुर अपार्टमेंट, जाधव पार्क, आकृती रेसिडेन्सी, अरुण आर्केड, मारुती कॉप्लेक्स, सरोजिनी हौसिंग सोसायटी, संजीवणी हौसिंग सोसायटी, श्रीकृष्ण अपार्टमेंट, मल्हार रेसिडेन्सी आदी ठिकाणी संबंधित अधिका-यांसमवेत जाऊन पाहणी केली.

Previous articleआता राजकारणासाठी नावाचा वापर थांबेल; काँग्रेसची भाजपवर टीका
Next articleएका मुसलमानामुळे जिंकली हिंदूंनी राम मंदिराची लढाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + two =