पिंपरी,दि.16 ऑक्टोबर 2019 (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पिंपरी पुतळा परिसर मैदानात पिंपरी-चिंचवड भोसरी विधानसभे करिता आदरणीय अॅड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले मात्र सभेच्या स्टेजवर जळकलेल्या फ्लेक्सवर एकाच उमेदवाराचा फोटो आणि फक्त त्याकरिता सर्व असल्याचे पहावयास मिळाले भोसरी विधानसभा मतदार संघाचे छप्परबंद समाजाचे शहानवाज शेख फ्लेक्स वर वंचित राहिले त्यामुळे येथील गटबाजी दिसून येत आहे, बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन जाण्याचा निर्णय हा आज सगळीकडे पाळताना दिसत आहे पण पिंपरी विधानसभा मध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला उमेदवारांना चक्क टाळले जाते हे दिसत आहे यावरून राजकीय चर्चा राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण आला आहे शहानवाज शेख हे उमेदवार तसेच राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक नेत्यांना याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही व जनतेचा कौल कोणाच्या पारड्यात पडेल हे येणाऱ्या 21 ऑक्टोबर रोजी मतदानातून दिसून येईल वंचित बहुजन आघाडी चा वाढता जोर जरी असला तरी अंतर्गत कुजबूज बाहेरही दिसू लागली आहे यावर जरी समोरून नाकारले जात असले तरी अंतर्गत नाराजी दिसून येत आहे
Home ताज्या बातम्या बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेच्या स्टेज वर भोसरी विधानसभेचे उमेदवार शहानवाज शेख यांचा फोटो...